esakal | वणीतील पान ठेल्यावरून 71 हजारांची तंबाखू जप्त: दोन संशयितांना अटक
sakal

बोलून बातमी शोधा

tobacco of 70 thousands caught in yavatmal district

मृणाल नवनाथ वेलेकर (वय 33, रा. फाले ले-आउट, वणी) व नीरज रमेशचंद्र गुप्ता असे अटकेतील संशयितांची नावे आहेत. वणी शहरात मागील अनेक दिवसांपासून सुगंधित तंबाखूची परप्रांतातून व लगतच्या जिल्ह्यांतून आयात होत आहे

वणीतील पान ठेल्यावरून 71 हजारांची तंबाखू जप्त: दोन संशयितांना अटक

sakal_logo
By
तुषार अतकारे

वणी (जि. यवतमाळ) : शहरातील फाले ले-आउट परिसरात प्रतिबंधित सुगंधी तंबाखू व गुटखाविक्री होत असल्याच्या माहितीवरून वणी पोलिसांनी शनिवारी (ता.19) दुपारी छापा टाकला. त्यात 71 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.

जाणून घ्या - कल्पना सुचली अन् छतावर फुलविली पालेभाज्यांची बाग; घरीच मिळतो रसायनमुक्त भाजीपाला

मृणाल नवनाथ वेलेकर (वय 33, रा. फाले ले-आउट, वणी) व नीरज रमेशचंद्र गुप्ता असे अटकेतील संशयितांची नावे आहेत. वणी शहरात मागील अनेक दिवसांपासून सुगंधित तंबाखूची परप्रांतातून व लगतच्या जिल्ह्यांतून आयात होत आहे. त्यात मजा 108, पानपराग व सुगंधित सुपारीचा समावेश आहे. या घटनेच्या दिवशी मिळालेल्या माहितीच्या आधारे ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शोधपथकाने छापासत्र अवलंबले आहे. 

या कारवाईत मजा तंबाखूचे 200 व 50 ग्राम वजनाचे डब्बे किंमत 65 हजार 139 रुपये, पानपरागचे 12 डब्बे किंमत तीन हजार 600 व प्रतिबंधित सुगंधित सुपारी 46 पॉकेट किंमत दोन हजार 740 असा एकूण 71 हजार 499 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा - घरी काम करणाऱ्या मजुरांनी स्लॅब टाकण्याची केली तयारी अन् तेवढ्यात आला धडकी भरवणारा आवाज

याबाबत अन्न व औषधी विभागाला माहिती देण्यात आल्यावर दोन्ही संशयितांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. वणीचे उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुजलवाकर, ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गोपाल जाधव, सुदर्शन वानोळे, सुधीर पांडे, सुनील खंडागळे, अमित पोयाम, रत्नपाल मोहाडे, पंकज उंबरकर, दीपक वंडर्सवार यांच्या पथकाने ही कारवाई केली.