‘नवतपा’च्या पहिल्याच दिवशी, सूर्याने ओकली आग; अकोल्यात 47.4 विक्रमी तापमान

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 मे 2020

उन्हाळा म्हटला की, अंगाची लाहीलाही करून सोडणारे तापमान, चिंब भिजवणारी गर्मी आणि चामडी सोलणारे ऊन, अशी व्याख्याच अकोल्यात आता रूढ झाली आहे.

अकोला : 'नवतपा'च्या पहिल्याच दिवशी सूर्याने आग ओकायला सुरुवात केली आणि मोसमातील सर्वाधिक 47.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद सोमवारी (ता.25) अकोल्यात झाली. एकीकडे कोरोना रुग्णांची झपाट्याने होत असलेली वाढ आणि दुसरीकडे सूर्याचा ताप, यामुळे अकोल्यात सध्या हाहाकार माजला आहे.

उन्हाळा म्हटला की, अंगाची लाहीलाही करून सोडणारे तापमान, चिंब भिजवणारी गर्मी आणि चामडी सोलणारे ऊन, अशी व्याख्याच अकोल्यात आता रूढ झाली आहे. गेल्या काही वर्षात तर, जगातील सर्वोष्ण शहरांमध्ये अकोलाचे नाव नोंदले गेले आहे. यापूर्वी सर्वाधिक 48 अंश सेल्सिअस व त्यानंतर 47 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद अकोल्यात झाली होती. यावर्षी सुद्धा सूर्य आग ओकत असून, दोन दिवसांपासून अकोल्यात 46 अंशाहून अधिक कमाल तापमानाची नोंद होत आहे. 

आवश्यक वाचा - आंगण-रणांगण आंदोलन ट्रोलनंतर भाजपमध्ये धुसफूस; पक्षाचे ध्येय धोरणांवर आक्षेप घेत या पदाधिकाऱ्याने दिला राजीनामा

सोमवारी (ता.25) तर, सूर्याचा तीव्र प्रकोप अकोलेकरांना सोसावा लागला. सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी सूर्याचा रोहिणी नक्षत्रात प्रवेश झाला आणि नवतपाचीही सुरुवात झाली. चिंतेची बाब म्हणजे नवतपाच्या पहिल्याच दिवशी तापमानाचा आगडोंब अकोल्यात अनुभवला आला असून, मोसमातील सर्वाधिक 47.4 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद सोमवारी झाली. त्यामुळे पुढील नऊ दिवस सूर्याचा चांगलाच प्रकोप अकोलेकरांना सोसावा लागणार असून, तापमानाचा नवा उच्चांक अकोल्यात नोंदला जाऊ शकतो.

हेही वाचा - Video : या माणुसकीला सलाम...! कोरोनाबाधित हिंदू व्यक्तीवर मुस्लिम बांधवांकडून अंत्यसंस्कार

तापमानाचा उचांक नोंदला जाण्याची शक्यता
नवतपा सुरू होण्याच्या दोन दिवस आधीच अकोल्यामध्ये तापमानाचा जोर अनुभव आला आणि पारा 46 अंशापार गेला होता. सोमवारी नवतपा सुरू होण्यासोबतच 47.4 अंश सेल्सिअसची नोंद अकोल्यात झाली. मात्र पुढील आठवडाभर अकोल्यात तीव्र उष्णतेची लाट राहणार असल्याचे संकेत हवामान विभागाने दिली आहेत. त्यामुळे या आठवड्यातच जिल्ह्यातील उच्चांकी तापमानाचे रेकॉर्ड तोडले जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

अशी घ्या काळजी

  • सकाळी नऊ वाजतानंतर शक्यतो घराबाहेर पडू नका.
  • बाहेर पडताना पांढरी किंवा सेल, सुती कपडे परिधान करावी.
  • काळे व भडक रंगाची कपडे घालू नयेत.
  • दिवसभर वेळोवेळी थंड व स्वच्छ पाणी पीत राहावे.
  • पूर्णवेळ झोप घ्यावी. तेलकट शिळे अन्न खाणे टाळावे.
  • वेळोवेळी हात चेहरा स्वच्छ धुवावा.
  • दिवसातून किमान चार वेळा थंड पाण्याने डोळे धुवावेत.
  • बाहेर पडताना टोपी, रुमाल, शेला, सनगॉगल वापरावे.
  • दिवसभरात किमान चार ते सहा लिटर पाणी प्यावे.

घाबरू नका, खबरदारी घ्या
तापमानाचा जोर वाढत असून, अशावेळी उष्णतादाह होण्याची शक्यता अधिक राहते. उष्णतादाह झाल्यास किंवा ऊन लागल्यास मळमळ होणे, डोके दुखणे, अंग दुखणे, अंग तापणे, डोळे लाल होणे, डोळ्याची जळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: today recorded a high of 47.4 degrees Celsius in Akola district