toor and soybean rate increases in open market in amravati
toor and soybean rate increases in open market in amravati

खुशखबर! तूर, सोयाबीनची शेतकऱ्यांना साथ; खुल्या बाजारात मिळताहेत विक्रमी दर

अमरावती : गेल्या काही वर्षांनंतर यंदा प्रथमच तुरीसह सोयाबीन व चन्याला हमीदरापेक्षा अधिक भाव खुल्या बाजारात मिळाला आहे. सोयाबीनचा हंगाम संपला असला तरी घरात साठवलेला सोयाबीन शेतकऱ्यांनी विक्रीला काढला आहे. रब्बी हंगामातील चना बाजारात आला असून भाव चढलेले आहेत, तर खरिपातील शेवटचे पीक असलेल्या तुरीला सध्या चांगले दिवस आहेत. हमीदरापेक्षा हजार ते बाराशे रुपये अधिक दर मिळू लागला आहे.

खरीप हंगामात पावसाने घातलेल्या गोंधळामुळे यंदा पिकांची उत्पादकता घसरली आहे. मूग व उडीद हातचे गेल्यानंतर आशा असलेल्या सोयाबीन तसेच तुरीने शेतकऱ्यांना साथ दिली. कृषी विभागाने केलेल्या पीकपाहणीत सोयाबीनची उत्पादकता कमी असल्याचे सांगितले आहे. पेरणी क्षेत्राच्या तुलनेत उत्पादनाची सरासरी कमी आली आहे. हंगामाच्या प्रारंभीपासूनच यंदा सोयाबीनला हमीदराच्या तुलनेत चढे दर मिळाले आहेत. आता हंगाम आटोपत असताना सोयाबीनला दोनशे ते सातशे रुपये चढे दर मिळत आहेत. सुपर दर्जाच्या सोयाबीनला येथील बाजार समितीत शनिवारी (ता.13) किमान 4100 तर 4500 रुपये कमाल भाव मिळाला. मध्यम दर्जाच्या सोयाबीनलाही यावेळी हमीदराच्या तुलनेत चांगला भाव आहे. 3950 रुपये कमाल भाव मिळाला.

खरिपात आशा असलेल्या तुरीने शेतकऱ्यांना यंदा चांगली साथ दिली आहे. खुल्या बाजारात तुरीचे दर चढलेले आहेत. लाल तुरीला 7 हजार ते 7240 रुपये भाव मिळाला, तर त्याखालील मध्यम दर्जाच्या तुरीला 6500 ते 6900 रुपये दर आहे. दोन्ही दर हमीदरापेक्षा अधिक आहेत.  

हरभऱ्याचे वांदे सुरूच -
रब्बी हंगामातील हरभऱ्याचे पीक बाजारात आले असून आगमनापासूनच हरभऱ्याचे भाव चढू शकलेले नाहीत. शासनाने हरभऱ्याला 4875 रुपये हमीदर दिला असला तरी गावरानी चन्याला पाचशे ते दोनशे रुपये कमी दर दिले जात आहे. यंदा हरभऱ्याचे पेरणीक्षेत्र तुलनेने अधिक आहे.

बाजार समितीत मिळालेले भाव -

धान्य कमाल किमान हमीभाव
तूर लाल 7000 7,240 6000
मीडियम 6500 6900 -
हरभरा (गावरानी) 4300 4675 4875
हरभरा मीडियम 4250 4650  -
सोयाबीन 4100 4500 3880
मीडियम 3750 3950 -

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com