गडचिरोली जिल्ह्यात तब्बल 1400 कोटी रुपयांची मोहाची उलाढाल

गडचिरोली जिल्ह्यात तब्बल 1400 कोटी रुपयांची मोहाची उलाढाल

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात (Gadchiroli) मोहफुलांची मोठी आर्थिक उलाढाल होते. सुमारे 3 लाख मजूर मोहफुल गोळा करण्याचे काम करतात त्याद्वारे 1400 कोटी रुपयांची उलाढाल होत असते. अशा या मोहफुलांचा (Mahua Flowers) वापर केवळ मद्यनिर्मितीसाठी न करताना त्यातील औषधी आणि पोषण मूल्य यासंदर्भात झालेले संशोधन लक्षात घेऊन या फुलांचा वापर पोषक आहारासाठी करण्याचे प्रयत्न करावे. त्यासाठी जिल्ह्यात प्रक्रिया केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी राज्याचे नगरविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली. (Total business from Mahua flowers is of 1400 crores)

गडचिरोली जिल्ह्यात तब्बल 1400 कोटी रुपयांची मोहाची उलाढाल
धक्कादायक! कोरोनामुळे आई-वडिलांचं छत्र हरवलेली लहान मुलं परस्पर दत्तक

नागपूर विभागीय खरीप हंगाम पूर्वतयारी आढावा बैठक कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गडचिरोली जिल्ह्याच्या कृषी विकासासाठी या बैठकीत विविध मुद्दे मांडले. गडचिरोली जिल्ह्याला सेंद्रिय शेतीचा जिल्हा म्हणून ओळख मिळावी, यासाठी कृषी विभागाने विशेष नियोजन करावे. पारंपरिक शेतीला आधुनिकतेचे बळ देतानाच ती कमी खर्चाची आणि उत्पादन वाढविणारी असावी, यासाठी कृषी विद्यापीठांनी वाण आणि अवजार संशोधन करावे, असे त्यांनी केले. गडचिरोली जिल्ह्याला खतांचे वितरण चंद्रपूर येथून केले जाते. सिरोंचा तालुका हा सुमारे 350 किमी मीटरहून अधिक अंतरावर आहे.

अशावेळी या तालुक्‍याला खतांचा पुरवठा लगतच्या तेलंगणा येथून करण्याची परवानगी देण्यात यावी. जेणेकरून वेळेची बचत होतानाच वाहतूक खर्चही कमी होईल. गडचिरोली जिल्ह्यात धानाचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. ते साठविण्यासाठी गोदामांची संख्या वाढविणे आवश्‍यक आहे. हा विषय कृषी संलग्न असल्याने गडचिरोली जिल्ह्यात गोदामांची संख्या वाढविण्यात यावी. जेणेकरून धानाची साठवण क्षमतादेखील वाढविता येणे शक्‍य होईल.

गडचिरोली जिल्ह्यात वनसंपदा मोठी आहे. या जिल्ह्यात कृषी विभागाने विशेष नियोजन करून रासायनिक खते व औषधीविरहीत सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी प्रयत्न करावेत. संपूर्ण गडचिरोली जिल्हा सेंद्रिय शेतीचा जिल्हा म्हणून ओळखला जावा, अशी इच्छा पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. गडचिरोली जिल्ह्यात कृषी विभागाची 279 पदे रिक्त असून ती तातडीने भरण्याची मागणी पालकमंत्री शिंदे यांनी यावेळी केली.

गडचिरोली जिल्ह्यात तब्बल 1400 कोटी रुपयांची मोहाची उलाढाल
सावधान! नामांकित कंपन्यांचे अनोळखी कॉल्स उचलताना १० वेळा करा विचार; अन्यथा...

स्ट्रॉबेरी शेतीचाही विचार

गडचिरोली जिल्ह्यात स्ट्रॉबेरी लागवड यशस्वी झाल्याचे सांगतानाच आपण स्वत: सहा शेतकऱ्यांना महाबळेश्‍वर येथून स्ट्रॉबेरीची रोपे उपलब्ध करून दिली होती. त्याची लागवड यशस्वी होऊन शेतकऱ्यांना लाभ झाल्याचे पालकमंत्री शिंदे यांनी सांगितले. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात स्ट्रॉबेरी शेतीला चालना मिळावी, अशी सूचना पालकमंत्री शिंदे यांनी केली. तसेच कोरची तालुक्‍यात जांभळाचे वन आहे. येथील जाभळांना संपूर्ण राज्यभर बाजारपेठ उपलब्ध करून देणे आवश्‍यक असून संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात जांभळाची शेती करण्यासाठी प्रोत्साहन देतानाच याठिकाणी प्रक्रिया उद्योग देखील सुरू करण्यात यावा, असे पालकमंत्री शिंदे यांनी सांगितले.

(Total business from Mahua flowers is of 1400 crores)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com