

पवनी (जि. भंडारा) : तालुक्याची निर्मिती होऊन ३७ वर्षांचा काळ लोटला. तालुक्यात मोठ्या प्रमाणात पर्यटनस्थळे असताना रोजगार शून्य आहे. त्यामुळे तरुणांच्या हाताला काम नाही. तालुक्यातील पवनी, अड्याळ, गोसेखुर्द, कोरंभी, नेरला, भावड, पिंपळगाव आदी गावांना धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. विविध सोयीसुविधांसोबत येथे पर्यटनाच्या दृष्टीने विकास झाला तर तालुक्याती अर्थकारणाला नक्कीच गती मिळेल. पवनी शहराचा इतिहास सम्राट अशोक यांच्या कालखंडच्या पूर्वीचा आहे.
१८६५ साली विदर्भातील सर्वांत पहिली नगर परिषद पवनी आहे. त्या काळात पवनी शहर हातमागावरील कापड व्यवसायासाठी देशात प्रसिद्ध होते. वाढत्या यंत्रिकीकरणामुळे हातमागावरचा व्यवसाय मोडकळीस आला आणि विणकरांना रोजगारासाठी गुजरात येथील सुरत व अहमदाबाद येथे पलायन करावे लागले. त्यामुळे शहरातील लोकसंख्या मोठ्या प्रमाणात घटली. बदलत्या हवामानामुळे विड्याच्या पानांचे मळेसुद्धा नाहीसे झाले.
तालुक्यातील मासेमारी आणि बुरड व्यवसायसुद्धा संपण्याच्या मार्गावर दिसून येतो. वैनगंगा नदीच्या वाहत्या पाण्यातून मासेमारी व्यवसाय मोठ्या प्रमाणावर होत होता. त्यातून मासेमारांना चांगले उत्पादन मिळत होते. परंतु, गोसेखुर्द धारणामुळे नदीचे वाहते पाणी थांबले. त्यामुळे मासेमारी व्यवसायावर गदा आली. पर्यटनविकासातून रोजगारनिर्मिती व्हावी, अशी स्थानिकांची मुख्य मागणी आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन नागरिकांच्या रोजच्या जगण्याशी प्रश्न सोडविणे गरजेचे आहे.
पवनी तालुका हिरवाईने नटलेला आहे. प्राचीन व ऐतिहासिक वारसा असलेल्या या शहरात वैजेशवर मंदिर, पंचमुखी अष्टविनायक, गणपती मंदिर, चंडिका मंदिर, मुरलीधर मंदिर, शोबीतलाव देवस्थान, बाबा ममरेज खाँ शहीद दर्गा, चांदशावली दर्गा, महासमाधी भूमी, चंद्रमणी विहार अशी धार्मिक स्थळे आहेत. यासोबतच गोंडकालीन किल्ल्याची तटबंदी, दिवणघाट, वैजेशवर घाट, पवनखिडकी, घोडेघाट, गरुड खांब, टेम्बे स्वामी मठ, बुद्धकालीन स्तूपाचे अवशेष, सुलेमान टेकडी, हरदोली टेकडी ही ऐतिसासिक व प्राचीन साक्ष देणारी स्थळे आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.