Tractor Truck Accident: कारंजा मूर्तिजापूर मार्गावर ट्रक ट्रॅक्टरच्या भीषण अपघातात एक ठार
Accident News: कारंजा-मूर्तिजापूर मार्गावर ट्रकने ट्रॅक्टरला धडक दिल्याने गोपाल पापळे याचा जागीच मृत्यू झाला; अविनाश आठवले गंभीर जखमी. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून पुढील तपास सुरू आहे.
कारंजा : कारंजा-मूर्तिजापूर मार्गावरील शहरालगतच्या श्री मंगलम जवळ १३ ऑगस्ट रोजी सकाळी साडे ११ वाजताच्या सुमारास झालेल्या ट्रक आणि ट्रॅक्टरच्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला.