जोरदार पावसामुळे तीन तास वाहतूक ठप्प

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 ऑगस्ट 2019

सौंसर (जि. छिंदवाडा) : शनिवारी सकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे रामाकोनानजीकच्या गहरानाल्याच्या पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने नागपूर-छिंदवाडा मार्गावरील वाहतूक तब्बल तीन तास ठप्प झाली. दुपारी 12 वाजताच्या सुमारास सौंसर तालुक्‍यात जोरदार पावसाला सुरुवात झाली. यामुळे नदीनाले ओसंडून वाहू लागले. नागपूर-छिंदवाडा मार्गावरील रामाकोनानजीकच्या गहरानाल्याला एका वाजताच्या सुमारास पूर आला. पुलावरून पाणी वाहत असल्याने दुपारी 1 ते 2 वाजेपर्यंत वाहतूक ठप्प झाली. पूर ओसरल्यानंतर वाहतून सुरळीत झाली. मात्र अचानक तीन वाजेपासून पाण्याची पातळी वाढली व पुन्हा पुलावरून पाणी वाहू लागले.

सौंसर (जि. छिंदवाडा) : शनिवारी सकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे रामाकोनानजीकच्या गहरानाल्याच्या पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने नागपूर-छिंदवाडा मार्गावरील वाहतूक तब्बल तीन तास ठप्प झाली. दुपारी 12 वाजताच्या सुमारास सौंसर तालुक्‍यात जोरदार पावसाला सुरुवात झाली. यामुळे नदीनाले ओसंडून वाहू लागले. नागपूर-छिंदवाडा मार्गावरील रामाकोनानजीकच्या गहरानाल्याला एका वाजताच्या सुमारास पूर आला. पुलावरून पाणी वाहत असल्याने दुपारी 1 ते 2 वाजेपर्यंत वाहतूक ठप्प झाली. पूर ओसरल्यानंतर वाहतून सुरळीत झाली. मात्र अचानक तीन वाजेपासून पाण्याची पातळी वाढली व पुन्हा पुलावरून पाणी वाहू लागले. यामुळे तीन वाजेपासून पाच वाजेपर्यंत पुन्हा वाहतूक ठप्प झाली. लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या. वाहनचालकांना आमला, रामपेठ असा प्रवास करून सौंसर येथे पोहचले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: traffic jam due to rain

टॅग्स