Washim : वाहतूक कोंडीमुळे शहरातील नागरिक बेजार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

traffic

Washim : वाहतूक कोंडीमुळे शहरातील नागरिक बेजार

रिसोड : रिसोड शहरातील वर्दळीचा आणि महत्त्वाचा रस्ता म्हणून ज्या रस्त्याची ओळख आहे. तो रस्ता म्हणजे बस स्टँड रोड आणि त्या रस्त्याचे काम कासव गतीने सुरू असल्या कारणाने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. या गंभीर बाबीकडे कोणीच लक्ष देत नसल्याने वाहनधारकांना जिव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

शहरातील सिव्हिल लाईन रस्ता सर्वाधिक वर्दळीचा रस्ता आहे. पाच वर्ष याच रस्त्यावर मरणयातना भोगल्यानंतर आता एका बाजूचा रस्ता नुकताच पुर्ण झाला आहे. याच रस्त्यावर अनेक बँका आणि महत्त्वाच म्हणजे बस स्टँड लोणी फाटा मालेगाव नाका नेहमी वर्दळीचा रस्ता म्हणून या रस्त्याची ओळख आहे.एकतर्फी रस्त्याचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे.संपूर्ण वाहनांची वर्दळ एकाच बाजूने सुरू असल्याकारणाने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून तासंनतास वाहन धारकांना या रस्त्यावर ताटकळत बसावे लागत आहे. याच रस्त्यावर अनेक बँका व बस स्थानक आहे.

शहरातील अनेक शाळांमध्ये याच रस्त्यावरून जावं लागतं. पेट्रोल पंप या रस्त्यावर असल्याकारणाने एसटी बसेस यांना पेट्रोल भरण्यासाठी व अकोला लोणार जाण्यासाठी याच रस्त्यावरून बसेसला जावे लागतात त्यामुळे बसेसला सुद्धा मोठ्या प्रमाणात पोहोचायला वेळ होत आहे. शाळकरी विद्यार्थ्यांना देखील याचा मोठ्या प्रमाणात त्रास होत असून अनेक बसेस या उशिरा पोहोचत आहेत त्यामुळे रस्त्याच्या कामाची गती वाढवावी अशी मागणी शाळकरी विद्यार्थ्यांसह नागरिक करत आहे.

रस्ता अजूनही अपूर्ण

तब्बल चार वर्ष या रस्त्याचे भिजत घोंगडे कायम होते. राजकीय श्रेयवादाच्या लढाईत रस्त्याअभावी नागरिक घायकूतीला आले होते. अनेक वेळा रस्त्याचे काम सुरू झाले तसेच ते अनेक वेळा बंद केले. चार पावसाळे चिखलस्नानाची पर्वणी नागरीकांनी अनुभवल्यानंतरही रस्त्यावरून राजकीय चिखलफेक सुरू होती. काहींनी तर आपल्या राजकीय उदयासाठी आंदोलनाचे फार्स आटोपले. मात्र रस्ता अजूनही पुर्ण झालाच नाही

वाहतूक पोलिसांची नियुक्ती व्हावी.

या रस्त्यावर अनेक शाळा महाविद्यालय आहेत. वाहतूक कोंडीने विद्यार्थ्यांची शाळा बुडते. पोलीस प्रशासनाने या रस्त्यावर वाहतुक पोलिसाची नियुक्ती करावी अशी मागणी होत आहे.