Nagpur News : पोहण्याचा मोह जिवावर बेतला, सख्ख्या भावांसह पाच तरुणांचा मृत्यू; सगळ्यांचं वय २० ते २६ वर्षे
Swimming Accident : चंद्रपूरच्या घोडाझरी तलावात पोहण्यासाठी गेलेल्या पाच युवकांचा बुडून मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.
नागभीड : धुळवडीनंतर घोडाझरी तलावात पोहण्यासाठी गेलेल्या पाच मित्रांचा बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड येथील घोडाझरी तलावात शनिवारी (ता. १५) दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडली.