hiyansh death in leopard attack
sakal
- सुबोध बैस
तिरोडा (जि. गोंदिया) - तालुक्यातील खडकी (डोंगरगाव) येथे शुक्रवारी (ता. ९) सकाळी साडेसातच्या सुमारास घराच्या मागे चुलीजवळ बसलेल्या चार वर्षीय चिमुकल्यावर हल्ला करीत बिबट्याने त्याला उचलून नेले. यात त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर नातेवाइकांसह गावकऱ्यांचा टाहो हृदय हेलावणारा होता. वारंवार तक्रारी करूनही वनविभागाने उपाययोजना केली नसल्यानेच चिमुकल्याला जीव गमवावा लागला, असा आरोप करीत गावकऱ्यांनी वनविभागाच्या नाकर्तेपणावर संताप व्यक्त केला आहे.