Student Drowning: दोन विद्यार्थ्यांचा नदीत बुडून मृत्यू; फुटबॉल खेळल्यानंतर बोकडडोह नदीत गेले होते पोहायला
River Accident: सिंदेवाही येथे दोन विद्यार्थ्यांचा बोकडडोह नदीत बुडून मृत्यू झाला. फुटबॉल खेळल्यानंतर पोहण्यासाठी गेले असता ही दुर्घटना घडली. या अपघातामुळे वाकडे आणि गोपाले कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
सिंदेवाही : शाळेला सुट्टी असल्यामुळे सकाळी फुटबॉल खेळून पोहायला गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा येथील बोकडडोह नदीमध्ये बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवार (ता. १६) दुपारी एक वाजताच्या सुमारास घडली.