Husband Killed in Truck Collision : गणपती दर्शनासाठी भंडाऱ्यात आलेल्या दाम्पत्याच्या दुचाकीला ट्रकने धडक दिली. या भीषण अपघातात पतीचा मृत्यू झाला, तर पत्नी आणि मुलगा जखमी झाले. ही घटना मंगळवारी रात्री १० वाजताच्या सुमारास भंडारा शहरातील साईमंदिरसमोर घडली. जगदीश गजानन चकोले (३६) रा. मोहाडी ता. मौदा जि.नागपूर असे मृताचे नाव आहे.