
वणी/झरीजामणी (जि. यवतमाळ) : झरीजामणी तालुक्यातील गणेशपूर (ख.) येथे बुधवारी (ता. २५) सोसाट्यांच्या वाऱ्यासह पाऊस झाला. यामुळे डिलाईट केमिकल प्रा. लि. या चुना फॅक्टरीचे टिनाचे शेड कोसळले. यात एका २१ वर्षीय महिला कामगाराचा मृत्यू झाला. तर पाच ते सहा कामगार जखमी झाले.