Bhandara News: लाखांदूर हादरले! प्रसूतीनंतर नवजात शिशूचा मृत्यू आणि पुढील उपचाराला नेत असताना माताही दगावली
Healthcare Crisis: लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीनंतर आई आणि नवजात शिशूचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. रुग्णालयातील गैरसोयीमुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
लाखांदूर (जि. भंडारा) : येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल झालेल्या गर्भवती महिलेच्या प्रसूतीनंतर काही वेळातच नवजात शिशूचा मृत्यू झाला; तर पुढील उपचारासाठी भंडाऱ्याला नेत असलेल्या मातेचाही वाटेतच मृत्यू झाला.