
Gondia News
sakal
सालेकसा/देवरी (जि. गोंदिया) : देवरी तालुक्यातील पुराडा येथे एका शेततळ्यात बुडून तीन मुलांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (ता. ५) रात्री आठच्या सुमारास उघडकीस आली. आदित्य सुनील बैस (वय १५), तुषार मनोज राऊत (वय १७, दोघेही रा. गडेवारटोला/पुराडा) आणि अभिषेक रामचरण आचले (वय २१, रा. पुराडा) अशी मृतांची नावे आहेत.