केळवद (ता. सावनेर) - सावनेर तालुक्यातील साधे-सुधे माळेगाव...इथल्या छोट्या शेतकरी कुटुंबातील मुलगी किरण दाढे. गावात कोणाचीही मुलगी क्रीडामैदानावर चमकावी अशी फारशी अपेक्षा नसते. पण किरणने ही पार्श्वभूमी झिडकारून नवी वाट घडविली..राज्य-राष्ट्रीय पातळीवर कबड्डी खेळून नाव, सन्मान आणि आई-वडिलांना अभिमान देणारी ही मुलगी, अचानक एका कीटकनाशकाची बाटली प्राशन करून या जगातून ''एक्झिट’ घेतली.किरण फक्त खेळाडू नव्हती; ती घराचा आधारस्तंभ होती. महिन्याचे पैसे कमावून घर सांभाळण्याचा प्रयत्न ती करायची. आई-वडिलांना काळजी करू देणार नाही, हा हट्ट होता. पण आयुष्यानेच तिची फसवणूक केली. सावनेर पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार सावनेर तालुक्यातील माळेगाव (टाऊन) येथील कबड्डीपटू किरण दाढे हिची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने तिला नोकरीची आवश्यकता होती..याच संधीचा फायदा घेत माळेगाव लगतच्या पटकाखेडी येथील स्वप्नील जयदेव लांबधरे या ३० वर्षीय तरुणाने त्याचे पटकाखेडी येथील शेत खदानच्या जागेत जात असल्याने तू माझ्याशी लग्न केले तर, किरण तसेच तुझ्या भावाला वेकोलीत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले.या विश्वासावर १० जुलै २०२० साली या दोघांनी लग्न केले. यानतंर लग्न होवूनसुध्दा किरण ही माहेरीच राहायची. वर्ष आले आणि गेले. मात्र किरण आणि तिच्या भावाला नोकरीवर लावून देण्याचे आश्वासन फोल ठरत होते, तसेच स्वप्निल हा किरणला संबंध ठेवण्यासाठी दबाव आणत होता. फोनवर शिवीगाळ करायचा यामुळे आपली फसवणूक झाली. यामुळे त्रस्त आणि खचलेल्या किरणने अखेर (ता. ४) कीटकनाशक घेऊन तिने जीवन संपविले..किरण ही माझी बहीण, माझ्या कुटुंबाचा आधारस्तंभ होती. तिच्या दुर्दैवी मृत्यूने आम्ही खचलेलो आहोत. माझ्या बहिणीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा व्हावी.- आकाश दाढे, मूत किरण हिचा धाकटा भाऊकिरण दाढे मृत्यू प्रकरणातील प्रमुख आरोपी स्वप्नील लांबधरे याच्यावर कलम १०८ नुसार कारवाई केलेली असून त्याला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.- दीपक निंबाळकर, पोलिस उपनिरीक्षक, पोलिस ठाणे, सावनेर.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.