Chandrapur News: कापणगावच्या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू; पाचगावातील चारही मृतांना एकाच ठिकाणी दिला अखेरचा निरोप
Accident News: राजुरा-गडचांदूर राष्ट्रीय महामार्गावरील कापणगाव येथे ट्रक-ऑटो अपघातात सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यातील चारही मृतक पाचगाव येथील असून त्यांना एकाच ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले.
राजुरा : गडचांदूर-राजुरा राष्ट्रीय महामार्गावरील कापणगाव येथे (दि. २८) झालेल्या भीषण अपघातात सहा जण ठार झाले. यातील चार मृतक पाचगाव येथील होते. त्यांना एकाच ठिकाणी मुखाग्नी देण्यात आला. यावेळी गावकऱ्यांचे डोळे पाणावले. गावात स्मशान शांतता पसरली आहे.