
Amravati News
sakal
अचलपूर/ धारणी : मेळघाटातील मातामृत्यू रोखण्यासाठी प्रशासन स्तरावर विविध उपाययोजना राबविल्या जात असल्या तरी आजही गर्भवती महिलांना आपला जीव गमवावा लागत असल्याचे दिसून येत आहे. त्याचा प्रत्यय पुन्हा आला. आठवड्याभरात तिसरा मातामृत्यू मेळघाटात झाला आहे. नवजात बालिकेच्या मृत्यूनंतर मातेने सुद्धा हे जग सोडल्याची घटना मेळघाटात घडली.