Wardha Accidentsakal
विदर्भ
Wardha Accident: वर्धा जिल्ह्यातील वाघधरे वाडी शिवारात भीषण अपघात; उभ्या ट्रकला स्कॉर्पिओची जोरदार धडक, एक ठार तर सात जखमी
Accident News: कन्हानजवळ उभ्या ट्रकला स्कॉर्पिओची जोरदार धडक बसून एकाचा मृत्यू झाला, तर सात जण गंभीर जखमी झाले. वर्धा जिल्ह्यात मध्यरात्री हा भीषण अपघात घडला असून ट्रकच्या उपस्थितीबद्दल स्थानिकांमध्ये चर्चा सुरू आहे.
कन्हान : वर्धा जिल्ह्यातील सिंधी रेल्वे येथून पोळा पाहून गावी परत येताना, कन्हान परिसरातील वाघधरे वाडी शिवारात उभ्या ट्रकला (एमएच ४०. बीजी. ०३७८) स्कॉर्पिओने (एमएच ४२. के. ८४६९) मागून जबर धडक दिली. त्यात एकाचा मृत्यू झाला तर ७ जण जखमी झाले.