कारंजा : भरधाव वेगात असलेल्या एका पिकअप वाहनाने दोन दुचाकींना जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत दोन दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना कारंजा दारव्हा मार्गावरील पॉवर हाउसजवळ रविवारी (ता.३) रोजी सकाळी १० वाजता घडली..नाना जयसिंगपुरे (वय ५६ रा. यशवंत कॉलनी, कारंजा) आणि सुभाष किसन चव्हाण (वय ५५ रा. शिक्षक कॉलनी, कारंजा) अशी मृतांची नावे आहे. कारंजा दारव्हा मार्गावर घडलेला हा अपघात इतका भीषण होता की, एक दुचाकी रस्त्याच्या कडेला फेकली गेली, तर दुसरी दुचाकी खाली पडली. या अपघातात जया नाना जयसिंगपुरे (वय ४० वर्ष, रा. कारंजा), प्रभू माणिक राठोड (वय ४८ वर्ष, रा. कामठवाडा, कारंजा) जखमी झाले आहे..घटनेची माहिती मिळताच कारंजा शहर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर रुग्णवाहिका चालक शंकर रामटेके, रमेश देशमुख व शिवम खोंड यांनी जखमींना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात आणले. .तपासणी दरम्यान यातील दोघांना डॉक्टरांनी मृत घोषित केले तर दोघांवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी बाहेर गावी पाठविले. या अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली असून, नागरिकांमध्ये वाहनचालकांच्या बेफिकिरीविषयी तीव्र संताप व्यक्त होत आहे. दरम्यान शहर पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास ठाणेदार शुक्ला यांच्या मार्गदर्शनात शहर पोलिस करीत आहे..Shravan Month 2025: कारुण्यसिंधू भवदुःखहारी, तुजवीण शंभो मज कोण तारी, भोसलेकालीन रघुराजेश्वर शिवमंदिरात पंचरंगी छटेचे शिवलिंग.एक क्षणाचा गाफीलपणाकारंजा दारव्हा मार्ग हा नेहमीच वर्दळीचा असून, अनेक वेळा भरधाव वाहनांमुळे अपघात घडत आहेत. या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने वेगमर्यादा, सिग्नल यंत्रणा आणि सीसीटीव्ही नियंत्रण यांची आवश्यकता आहे. आजच्या घटनेने पुन्हा एकदा रस्त्यावरचा एक क्षणाचा गाफीलपणा अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो याची आठवण करून दिली..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.