Bhandara Accident: रोवणीसाठी जाणाऱ्या मजुरांच्या पिकअपची झाडाला धडक; एक महिला ठार, २० जखमी, मासलमेटा येथील घटना
Accident News: लाखनी तालुक्यात मासलमेटा शिवारात पिकअप वाहन अपघातात ५५ वर्षीय रमाबाई नेवारे यांचा मृत्यू झाला. रोवणीसाठी मजूर घेऊन जात असलेले वाहन झाडावर आदळल्याने २० मजूर जखमी, त्यापैकी १० गंभीर.
लाखनी : रोवणीसाठी मजुरांना घेऊन जाणाऱ्या पिकअपने झाडाला धडक दिली. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून २० मजूर जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवार (ता.१) रोजी सकाळी मासलमेटा शिवारात घडली.