

Family Wiped Out in Fatal Crash on NH-44 Near Wardha District
sakal
हिंगणघाट (जि. वर्धा) : जड वाहनाने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत पती, पत्नी आणि त्यांच्या सहा वर्षीय चिमुकलीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर हॉटेल तनवीर-सगुना कंपनी परिसरात शुक्रवारी (ता. २२) सकाळी १० वाजता घडली आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.