
गडचिरोली : आरमोरी ते गडचिरोली महामार्गावर काटली येथे गुरुवार (ता. ७) एका अज्ञात ट्रकने सकाळी फिरायला गेलेल्या सहा मुलांना चिरडल्याची घटना घडली होती. ४८ तासात या घटनेतील आरोपी ट्रक चालक प्रवीण बाळकृष्ण कोल्हे (वय २६) रा. चिचगड, ता. देवरी, जि. गोंदिया आणि सहचालक सुनील श्रीराम मारगाये (वय ४७) रा. चिचगड, ता. देवरी. जि. गोंदिया यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.