शिकाऊ डॉक्टरचा खून प्रकरण; दोन आरोपींच्या पीसीआरमध्ये वाढ | Crime | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime
शिकाऊ डॉक्टरचा खून प्रकरण; दोन आरोपींच्या पीसीआरमध्ये वाढ

शिकाऊ डॉक्टरचा खून प्रकरण; दोन आरोपींच्या पीसीआरमध्ये वाढ

यवतमाळ - वैद्यकीय महाविद्यालयातील शिकाऊ डॉक्टरच्या खून प्रकरणात अटक केलेल्या दोन आरोपींची पोलिस कोठडी संपल्याने गुरुवारी (ता. १८) न्यायालयापुढे हजर करण्यात आले. न्यायालयाने पुन्हा आरोपींच्या पोलिस कोठडीत सहा दिवसांची वाढ केली. ऋषीकेश गुलाबराव सवळे ( वय 23 ,रा. महाविर नगर, यवतमाळ), प्रवीण संजीव गुंडजवार (वय 24 रा. सावित्रीबाई फुले सोसायटी) अशी कोठडी मिळालेल्या आरोपींची नावे आहेत.

दुचाकीचा धक्का लागल्याने वाद निर्माण होऊन अशोक पाल याचा वैद्यकीय महाविद्यालय परिसरात खून करण्यात आला होता. एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांनी मारेकऱ्यांना अटक करण्यासह विविध मागण्यांसाठी वैद्यकीय महाविद्यालयात आंदोलन सुरू केले होते. एकूणच प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तपास चक्रे वेगाने फिरविली.

हेही वाचा: ‘दंगली घडविणाऱ्यांच्या हाती सत्तेची सूत्रे जाता काम नये’

पाल याच्या खुनाचा उलगडा 48 तास उलटण्यापूर्वीच करीत दोन तरुणासह विधी संघर्ष ग्रस्तबालकाला अटक केली. 14 नोव्हेंबरला यवतमाळ शहर पोलिसांनी दोघांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोन्ही आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. तर विधिसंघर्षग्रस्त बालकाची बालसुधार गृहात रवानगी केली आहे.

दरम्यान गुरुवारी दोन आरोपींची पोलिस कोठडी संपल्याने पोलिसांनी अधिक तपासाच्या अनुषंगाने आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ मागितली. त्या अनुषंगाने आरोपींना अधिक सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

loading image
go to top