नववर्षामुळे रेल्वे गाड्या फुल्ल

सकाळ वृत्तसेवा
Friday, 13 December 2019

मध्यरेल्वेच्या अकोला स्थानकावरून लांब पल्यासाठी जाणाऱ्या सर्वंच गाड्यांमध्ये नाताळ व नवर्षांच्या पार्श्‍वभूमीर आरक्षण फुल्ल झाले आहे. तर काहींगाड्यांमध्ये 20 डिसेंबरपासून नो-रुमची स्थिती निर्माण झाल्याने प्रवाशांचा मोठी गरसोय होण्याची शक्यता आहे.

अकोला : मध्यरेल्वेच्या अकोला स्थानकावरून लांब पल्यासाठी जाणाऱ्या सर्वंच गाड्यांमध्ये नाताळ व नवर्षांच्या पार्श्‍वभूमीर आरक्षण फुल्ल झाले आहे. तर काहींगाड्यांमध्ये 20 डिसेंबरपासून नो-रुमची स्थिती निर्माण झाल्याने प्रवाशांचा मोठी गरसोय होण्याची शक्यता आहे.

दरवर्षी ख्रिसमस, नाताळ आणि नववर्षाचा जल्लोष साजरा करण्यासाठी बाहेरगावी जाण्याचे नियोजन नागरिकांकडून केले जाते. आरक्षणाअभावी प्रवासात होणारी गैरसोय टाळण्यासाठी काही महिन्यांपूर्वीच आरक्षण करुन नियोजन करण्यात येते. मात्र आता वेळेवर नियोजन करू पाहणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होणार आहे. कारण मुंबई, पुणे, अहमदाबाद, गोवा, दिल्ली आदी ठिकाणांवर जाणाऱ्या गाड्यांमध्ये आरक्षणाची स्थिती फुल्ल आहे. त्यामुळे अनेकांच्या चितेंत वाढ झाली आहे. आरक्षण खिडक्यांवर तात्काळचे आरक्षण मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे प्रवाशांचे नियोजन बिघडल्या जावू शकते. शिवाय चांगलीच गोरसोय होण्याचीही शक्यता आहे.

हेही वाचा - महिलांची छेडछाड कराल तर कारागृहात जाल

या गाड्यामध्ये नाही आरक्षण
अकोला स्थानकावरुन मध्य आणि दक्षिण-मध्य रेल्वेने उत्तर आणि दक्षिणेतील महत्वपूर्ण शहरांकडे रेल्वेने थेट जाण्याची सुविधा आहे. मध्य रेल्वे विभागातून मुंबई, पुणे मार्गे ये-जा करणाऱ्या सर्वच गाड्या हाऊसफुल्ल आहेत. त्यामध्ये गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस, अमरावती-मुंबई एक्स्प्रेस, अमरावती-पुणे एक्स्प्रेस, नागपूर-पुणे गरीब रथ, नागपूर-पुणे एक्स्प्रेस, पुणे-काचीगुडा एक्स्प्रेस, पुणे-हावडा हमसफर एक्स्प्रेस, हावडा-पुणे आझाद हिंद एक्स्प्रेस, हावडा-मुंबई गितांजली, मुंबई-हावडा मेल, कुर्ला-हावडा शालीमार एक्स्प्रेस यासह अन्य गाड्यांचा समावेश आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: trains full