esakal | यवतमाळमध्ये नऊ पोलिस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; पोलिस अधीक्षकांचे आदेश
sakal

बोलून बातमी शोधा

Transfers of 9 police officers in Yavatmal

जिल्हा पोलिस आस्थापना मंडळाची सोमवारी (ता.15) बैठक झाली. बैठकीत प्रशासकीय कारणास्तव तसेच कसुरीवरुन नऊ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

यवतमाळमध्ये नऊ पोलिस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; पोलिस अधीक्षकांचे आदेश

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : जिल्हा पोलिस दलात जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ रुजू झाल्यापासून पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू झाले आहे. सोमवारी पोलिस अधीक्षकांनी पुन्हा एकदा झटका दिला. बदल्यांची तिसरी यादी जाहीर झाली. यात पाच पोलिस निरिक्षकांसह चार साहायक पोलिस निरीक्षकांची बदली करण्यात आली.

गृहिणींनो, तळणाचे पदार्थ करताना हात आवरा; तेलाचे भाव भिडले गगनाला; लिटरमागे इतकी वाढ 

जिल्हा पोलिस आस्थापना मंडळाची सोमवारी (ता.15) बैठक झाली. बैठकीत प्रशासकीय कारणास्तव तसेच कसुरीवरुन नऊ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. नियंत्रण कक्षातील पोलिस निरीक्षक रवींद्र जेधे यांच्याकडे वसंतनगर ठाण्याचा तात्पुरता प्रभार देण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक किशोर जुनघरे यांची यवतमाळ सायबर सेल प्रभारी अधिकारी म्हणून बदली करण्यात आली. 

पोलिस निरीक्षक प्रवीण नाचणकर यांनी पुसद ग्रामिण पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक (गुन्हे) म्हणून, पोलिस निरीक्षक सुरेश मस्के यांची पुसद शहर पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक (गुन्हे) म्हणून बदली करण्यात आली. पाटण पोलिस स्टेशनचे ठाणेदार साहायक पोलिस निरीक्षक अमोल बारापात्रे यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. 

बाबाऽऽ बाबा! असे स्वतःचे आयुष्य संपवू नका; फेसबुक लाइव्ह करीत आत्महत्येचा प्रयत्न

पांढरकवडा पोलिस ठाण्यातील साहायक पोलिस निरीक्षक संगिता हेलोंडे यांच्याकडे पाटण पोलिस स्टेशनचा तात्पुरता प्रभार देण्यात आला. पांढरकवडा वाहतूक नियंत्रण उपशाखा पथक प्रमुख भरत चापईतकर यांची पांढरकवडा पोलिस ठाण्यात तर दारव्हा पोलिस ठाण्यातील साहायक पोलिस निरीक्षक प्रवीण लिंगाडे यांची पांढरकवडा वाहतूक नियंत्रण उपशाखा पथक प्रमुख म्हणून वर्णी लागली.

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image