भरधाव ट्रकची दुचाकीस धडक; 2 ठार

वृत्तसंस्था
रविवार, 30 डिसेंबर 2018

चांदूर रेल्वेच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकीवरील तिघांपैकी दोनजण जागीच ठार झाले. तर 1 महिला गंभीर जखमी झाली आहे. अपघातानंतर ट्रक घटनास्थळावरून वेगात निघून गेला. 
 

अमरावती- चांदूर रेल्वेच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकीवरील तिघांपैकी दोनजण जागीच ठार झाले. तर 1 महिला गंभीर जखमी झाली आहे. अपघातानंतर ट्रक घटनास्थळावरून वेगात निघून गेला. 

अमरावती- चांदूर रेल्वे मार्गावर टोपाझ हॉटेललगत हा अपघात झाला सुरेश महादेव कवटकर आणि जगदीश मधुकर वाकोडे (रा. न्यू हनुमान नगर अमरावती) अशी दुचाकीस्वार मृतांची नावे आहेत. तर एक महिला गंभीर जखमी असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शनिवारी रात्री सुरेश कवटकर, जगदीश वाकोडे आणि एक महिला (एम एच 27 बी 4582) क्रमांकाच्या दुचाकीवरून अमरावती छटा दिशेने येत असताना राज्य राखीव पोलीस दल वसाहतीच्या आधी बंद असलेल्या टोपाझ हॉटेलजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिली. या अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पळून गेला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In truck and Two Wheeler accident 2 Killed