धामणा (लिंगा) : गोंडखैरी ते मंगरुळ पांदण रस्त्यावर मंगळवारी (ता.२६ ) दुपारी १.१५ वाजताच्या सुमारास भीषण अपघात घडला. टोलनाका वाचवण्यासाठी कंटेनर ट्रक पांदण रस्त्याने नेणाऱ्या चालकाचा ट्रक विद्युत तारेच्या संपर्कात आल्यामुळे जागीच मृत्यू झाला..मृताचे नाव राजेशकुमार रामसुदर्शन यादव (वय ३१, रा. पिडारीया, ता. हनुमाना, जि. रिवा, मध्यप्रदेश) असे आहे. तो सिंगल ट्रान्सपोर्ट कंपनीच्या एनएल-०१/एन८१९३ या कंटेनर ट्रकवर चालक म्हणून कार्यरत होता. .चौदामैल येथे उड्डाणपुलासाठी राखड पोहचवून तो परतीच्या मार्गाने गोंडखैरी-मंगरुळ पांदण रस्त्याने जात होता. गोंडखैरी शिवारातील अग्रवाल यांच्या शेताजवळ असलेल्या ११ हजार व्होल्ट विद्युत तारेचा ट्रकच्या वरच्या भागाला स्पर्श झाल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली..Nagpur Fake Shalarth ID Scam: ६८० शिक्षकांवर अटकेची टांगती तलवार; शालार्थ घोटाळा, बनावट आयडी तयार केल्याचे उघड .माहिती मिळताच बळीराजा फाउंडेशनचे कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले व वीज विभागाशी संपर्क करून वीजपुरवठा बंद केला. कळमेश्वर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कळमेश्वर ग्रामीण रुग्णालयात पाठवला. मृतकाच्या मोबाईलवरील नंबरवरून ट्रान्सपोर्ट मालकाशी संपर्क साधून त्याला माहिती देण्यात आली. मालक घटनास्थळी येताच मृतकाची ओळख पटली..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.