

Devotees gather at Gurukunj Mozari during the 58th death anniversary event of Rashtrasant Tukdoji Maharaj.
esakal
तिवसा, : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५८ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त श्रीक्षेत्र गुरुकुंज मोझरी येथे आयोजित मौन श्रद्धांजली कार्यक्रमादरम्यानचा एक कथित व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमधील युवकांसंदर्भातील वक्तव्यावरून विविध पातळ्यांवर रोष व्यक्त होत असून मोठा वाद निर्माण झाला आहे. देशातील तरुणांच्या आंदोलनांना ‘अराजकता पसरवणारी’ आंदोलने असल्याचे कथित स्वरूपात संबोधण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.