Gurudev Seva Mandal Clarification
esakal
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५८व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त आयोजित मौन श्रद्धांजली कार्यक्रमातील एका निवेदनावरून वाद निर्माण झाला आहे. देशातील तरुणांच्या आंदोलनांना ‘अराजकता पसरवणारी आंदोलने’ असे संबोधण्यात आल्याचा आरोप करत अनेक तरुणांनी या वक्तव्याचा निषेध केला. संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाची चर्चा सुरू झाली. आता अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाकडून यावर स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.