esakal | अमरावती जिल्ह्यात कशाचा झाला कहर, कोण अडकले जाळ्यात
sakal

बोलून बातमी शोधा

संग्रहित छायाचित्र

भातकुली तहसील कार्यालयातील एका नायब तहसीलदारासह तब्बल 20 व्यक्तींचे कोरोनाची लागण झाल्याने चिंता वाढली आहे. या सर्वांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

अमरावती जिल्ह्यात कशाचा झाला कहर, कोण अडकले जाळ्यात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमरावती : जिल्ह्यात कोरोनाबाधीतांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढत आहे. त्यातच आता प्रशासनातील अधिकारी कोरोनाच्या जाळ्यात अडकत असल्याने सामान्यांचे काय होणार हा प्रश्‍न निर्माण झाला आहे.


भातकुली तहसील कार्यालयातील एका नायब तहसीलदारासह तब्बल 20 व्यक्तींचे कोरोनाची लागण झाल्याने चिंता वाढली आहे. या सर्वांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. दरम्यान, अंजनगावसुर्जी येथे कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. संबंधित तहसीलदार बडनेऱ्याच्या नवी वस्ती भागातील रहिवासी आहेत. यापूर्वी त्यांच्या कुटुंबातील त्यांचा भाऊ कोरोना संक्रमित आढळला होता, अशी माहिती आहे. इतर संक्रमितांमध्ये अंजनगावसुर्जीच्या डब्बीपुरा येथील 70 वर्षीय पुरुष, 23 वर्षीय युवती, 11 वर्षीय बालिका, 5 वर्षीय मुलगा, अशोकनगर अमरावती येथील 19 वर्षीय युवक व 55 वर्षीय पुरुष, जुनी वस्ती बडनेरा येथील 30 वर्षीय युवक तसेच माळीपुरा येथील 75 वर्षीय पुरुष, नवाथेनगर येथील 21 वर्षीय युवती, कॉंग्रेसनगर येथील 40 वर्षीय महिला, साबणपुरा येथील 24 व 45 वर्षीय महिला आणि 29 वर्षीय युवक, तर राठीनगर येथील 55 वर्षीय महिला यांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळले.

वाचा - आयुक्‍त तुकाराम मुंढेंची घेराबंदी, महिला अधिकाऱ्यांनी केली ही तक्रार, वाचा काय झाला प्रकार...

विलासनगर येथील 33 वर्षीय पुरुष, महानपुरा येथील 27 व 65 वर्षीय महिला, खोलापूरच्या काझीपुरा येथील 3 वर्षीय बालिका, अंबिकानगर येथील 65 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. त्यापैकी 19 अहवाल श्रीसंत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील विषाणू चाचणी प्रयोगशाळेतून, तर एक अहवाल नागपूर येथील खासगी प्रयोगशाळेकडून आलेला आहे. आता कोरोना संक्रमितांची संख्या 569 झाली.  

loading image