अमरावतीमधील २२ पोलिस शिपाई झाले क्वारंटाइन, हे आहे कारण

twenty two police constable sent to qurantine center in amravati
twenty two police constable sent to qurantine center in amravati

अमरावती : नागपुरीगेट या संवेदनशील परिसरात तैनात करण्यात आलेल्या मुख्यालयातील आरसीपीच्या २२ पोलिस शिपायांना मंगळवारी (ता. २६) क्वारंटाइन सेंटरमध्ये पाठविण्यात आले.
सोमवारी (ता. २५) या टीममधील एक जवान कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला होता.

शहरातील नागपुरीगेट परिसरात पोलिस सेवा देत आहेत. नागरिकांनी नियम पाळावे म्हणून चोवीस तास डोळ्यात तेल घालून हे कर्मचारी काम करतात. नागपुरीगेट पोलिसांच्या मदतीला काही दिवसांपासून मुख्यालयातील आरसीपीची एक तुकडी तैनात करण्यात आली होती. त्यापैकी दोन दिवसांपूर्वी एका जवानाची प्रकृती बिघडली. त्याचे थ्रोटस्वॅब तपासणीमध्ये पॉझिटिव्ह आढळले. त्यानंतर ड्यूटीवर असलेल्या सर्वांनाच परत बोलवून गाडगेनगर हद्दीतील एका क्वारंटाइन सेंटरमध्ये पाठविण्यात आले.

सोमवारी (ता. २५) आरसीपी ऐवज एसआरपीएफ जवान पॉझिटिव्ह आल्याची माहिती पुढे आली होती. परंतु कोरोना पॉझिटिव्ह जवान एसआरपीएफचा नसून, मुख्यालयातील आरसीपीचा असल्याचे नंतर स्पष्ट झाले होते. त्यामुळे आता अतिरिक्त राखीव पोलिस पथक पुन्हा या भागात तैनात करण्यात आले. महत्वाची बाब म्हणजे, बारा दिवसांपूर्वी गाडगेनगर ठाण्यातील एक पोलिस हेडकॉन्स्टेबल पॉझिटिव्ह आल्याने ठाण्यातील २९ पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसह वाहतूक शाखेचे चार अशा ३३ जणांना क्वारंटाइन सेंटरमध्ये पाठविले होते. त्या सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर ते कर्तव्यावर रुजू झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com