दोनदा लग्नाची मागणी अमान्य झाल्याने केला प्रेयसीचा खून

काही दिवसांआधी नयन ने एकाच दिवशी दोनदा शिल्पाच्या घारच्यांकडे लग्नाची मागणी केली होती.
दोनदा लग्नाची मागणी अमान्य झाल्याने केला प्रेयसीचा खून

पालांदूर : मुलीच्या घरच्यांनी लग्नाला नकार दिल्याने प्रेयसीच्या हाताची चाकूने नस कापून खून केल्याची घटना लाखनी तालुक्यातील पालांदूर येथे सोमवारी दुपारी उघडकीस आली.मऱ्हेगाव येथे राहणारी शिल्पा तेजराम फुल्लुके (१९) . ही पालांदूर येथील संताजी कला व वाणिज्य महाविद्यालयात द्वितीय वर्षाला शिकत आहे. तर नयन विश्वनाथ शहारे (१९) रा. पालांदूर हे या आधी एकाच शाळेत शिकलेले आहेत.

यांच्यात वर्ग आठवी पासूनच प्रेमसंबंध असल्याच्या चर्चा आहेत. शिल्पा हीची लग्नाची वय झाल्याने घरचे योग्य स्थळाची पाहणी करत होते. मात्र काही दिवसांआधी नयन ने एकाच दिवशी दोनदा शिल्पाच्या घारच्यांकडे लग्नाची मागणी केली होती. त्या दिवशी प्रथम तो आपल्या आई सोबत व नंतर एकटाच लग्नाची मागणी करायला गेला होता मात्र शिल्पाच्या कुटुंबीयांनी आरोपी हा कोणतेही काम करत नाही व त्याची पोटजात ही वेगळी असल्याने सांगत लग्नास नकार दिला होता. याचा राग येऊन आरोपीने शिल्पा ही सोमवरला खरेदीसाठी पालांदूर येथे आली असताना निर्जनस्थळी नेऊन धारदार चाकूने तिचे हाताची नस कापून तिला जिवे ठार मारल्याचे फिर्यादी कडून सांगण्यात येत आहे

या वेळी मृतदेहाजवळ चाकू आणि विषाची बाटलीही सापडली आहे. सदर घटने मध्ये पालांदूर पोलिसांकडून सोमवारच्या रात्री आरोपीला कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली असून मंगळवार ला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com