
धामणगावरेल्वे : इयत्ता बारावीच्या परीक्षेत शेतमजुराच्या जुळ्या मुलींनी जुळे यश मिळवून पालकांना सुखद धक्का दिला आहे. सकाळच्या शाळेनंतर रात्री उशिरापर्यंत उजळणी अशा सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर दोघींनी हे यश संपादन केले आहे. बारावीच्या निकालातून बहिणींची जुळी गुणवत्ता समोर आली आहे.