esakal | हुंडीवाले हत्याकांडातील दोन फरार आरोपी दहा महिन्यांनंतर अटकेत
sakal

बोलून बातमी शोधा

two absconding accused arrested in Hundiwale massacre

अखिल भारतीय गवळी समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा बांधकाम व्यावसायिक किसनराव हुंडीवाले यांच्या हत्याकांड प्रकरणातील फरार आरोपी मुन्ना उर्फ प्रवीण श्रीराम गावंडे आणि मंगेश श्रीकृष्ण गावंडे या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी (ता.6) दुपारी अकोल्यातूनच अटक केली. हे दोन्ही आरोपी घटनेच्या दिवसापासून फरार होते. आरोपीना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता आरोपींना 9 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

हुंडीवाले हत्याकांडातील दोन फरार आरोपी दहा महिन्यांनंतर अटकेत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : अखिल भारतीय गवळी समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा बांधकाम व्यावसायिक किसनराव हुंडीवाले यांच्या हत्याकांड प्रकरणातील फरार आरोपी मुन्ना उर्फ प्रवीण श्रीराम गावंडे आणि मंगेश श्रीकृष्ण गावंडे या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी (ता.6) दुपारी अकोल्यातूनच अटक केली. हे दोन्ही आरोपी घटनेच्या दिवसापासून फरार होते. आरोपीना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता आरोपींना 9 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. 


 स्वामी विवेकानंद राष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळ, कौलखेड या शैक्षणिक संस्थेतील सभासदांच्या निवड प्रक्रियेचा वाद 2014 पासून सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात सुरू आहे. याच वादाच्या प्रकरणात सोमवार 6 मे 2019 रोजी दुपारी 12 वाजताच्या दरम्यान किसनराव हुंडीवाले न्यास नोंदणी कार्यालयात त्यांचा मुलगा प्रवीण यांच्यासोबत उपस्थित असताना भारतीय जनता युवा मोर्चाचा माजी प्रदेश उपाध्यक्ष विक्रम ऊर्फ छोटू श्रीराम गावंडे, रणजित श्रीराम गावंडे, मुन्ना उर्फ प्रवीण श्रीराम गावंडे, धीरज प्रल्हाद गावंडे, सूरज प्रल्हाद गावंडे, श्रीराम कसदन गावंडे, सतीश सुखदेव तायडे, विशाल सुखदेव तायडे, मयूर गणेशलाल अहिरे, दिनेश ठाकूर, प्रतीक दत्तात्रय तोंडे, मंगेश श्रीकृष्ण गावंडे व मोहम्मद साबीर यांच्यासह त्यांच्या साथीदारांनी सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात येऊन किसनराव हुंडीवाले यांची हत्या केली होती. या प्रकरणातील आरोपी मोहम्मद साबीर, मुन्ना उर्फ प्रवीण श्रीराम गावंडे, मंगेश श्रीकृष्ण गावंडे हे तीघे जन फरार झाले होते. गत आठवडयात साबीर याला कर्नाटकातून अटक केल्यानंतर मुन्ना उर्फ प्रवीण गावंडे व मंगेश गावंडे या दोघांना स्थानीक गुन्हे शाखेचे प्रमूख शैलेष सपकाळ यांच्या पथकाने शुक्रवारी अटक केली. दरम्यान या प्रकरणातील आरोपी श्रीराम कसदन गावंडे यास तब्बल एक वर्षापर्यंत न्यायालयासमोर जामीन अर्ज करण्यास मनाई करण्यात आली आहे. या प्रकरणात अटक केलेल्या दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आल्यानंतर आरोपींना 9 मार्चपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. आरोपींना शहर पोलिस उपअधीक्षक यांच्या ताब्यात देण्यात आले असून, पुढील तपास त्यांच्याकडूनच करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा - लैंगिक शोषणासाठी ‘त्यांने’ बांधली होती छतावर झोपडी

कर्नाटकातून मोहम्मद साबीर घेतला होता ताब्यात 
अखिल भारतीय गवळी समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा बांधकाम व्यावसायिक किसनराव हुंडीवाले यांच्या हत्याकांडातील फरार आरोपी मोहम्मद साबीर यास सिव्हिल लाईन्स पोलिसांनी 29 फेब्रुवारी रोजी कर्नाटक राज्यातील बीदर येथून अटक केली होती. त्याच्या अटकेनंतर सहा दिवसांनी याच प्रकरणातील दोन आरोपी अटक करण्यास पोलिसांना यश आले आहे. 

न्यायालयात 565 पानांचे दोषारोपपत्र
या प्रकरणातील अटक करण्यात आलेले आरोपी न्यायालयाच्या आदेशान्वये कारागृहात आहेत. या प्रकरणाचा तपास करणारे तत्कालीन शहर उपविभागीय पोलिस अधिकारी उमेश माने पाटील यांनी योग्य तो तपास करून आरोपीविरोधात न्यायालयात 565 पानांचे दोषारोपपत्र दाखल केले होते. याप्रकरणी राज्य सरकारने सरकारी वकील म्हणून विख्यात वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केलेली आहे.

loading image