मुंबईतून दोन हवाला व्यापाऱ्यांना अटक

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 16 October 2019

नागपूर : गुजरातच्या व्यापाऱ्याला पाच कोटींनी गंडवून खंडणी प्रकरणात मुंबईतील दोन हवाला व्यापाऱ्यांना गुन्हे शाखेने अटक केली. त्यांना घेऊन एक पथक आज रात्री नागपुरात पोहोचणार असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. तर दुसरीकडे डॉन संतोष आंबेकरनंतर त्याचा "राइट हॅंड' भाचा नीलेश ज्ञानेश्‍वर केदार यालाही गुन्हे शाखेने अटक केली. नीलेशला न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. आता गुन्हे शाखेने आंबेकर आणि केदारसह त्याच्या पाच जणांवर मोक्‍का लावण्याची तयारी केली आहे. तर आंबेकरच्या संपत्तीवरही टाच येणार असल्याची माहिती समोर आली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरातचे व्यापारी जिगरभाई पटेल यांना पाच कोटींनी फसवून एक कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात रविवारी संतोष आंबेकरला अटक केली होती तर सोमवारी दुपारी संतोषचा राइट हॅंड भाचा नीलेश केदार यालाही अटक केली. शैलेशला आज न्यायालयात उपस्थित करण्यात आले. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. गुन्हगारी जगतात डॉन आंबेकरच्या आर्थिक व्यवहार भाचा नीलेश बघत होता. त्यामुळे कुणाकडून किती खंडणी किंवा वसुली झाली तसेच कुण्या व्यापाऱ्याकडून हवाला पैसा पोहोचवायचा असा सर्व हिशेब नीलेश सांभाळत होता. जिगरभाई पटेल यांना मुंबई-मालाडमधील एका दुसऱ्याच्याच भूखंडाचे बनावट दस्तावेज दाखूवन पाच कोटी घेतले होते. भूखंड अस्तित्वाच नसल्याचे लक्षात येताच पटेलने सीताबर्डीत तक्रार दिली होती. पोलिसात तक्रार दिल्याने चिडलेल्या संतोष आंबेकरने पटेल यांना पुन्हा एका कोटीची खंडणी मागितली होती. खंडणी न दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिली होती. गेल्या काही महिन्यांपूर्वीच मध्यवर्ती कारागृहातून एका हत्याकांडातून सुटून आलेल्या संतोषने पुन्हा गुन्हेगारी जगतात वचक निर्माण केला होता. मात्र, यावेळी तो आपला भाचा नीलेश केदार याला मोठे करण्यासाठी मोठमोठ्या बैठकांमध्ये नेत होता. पैशाचा व्यवहार शैलेशकडे असल्यामुळे गुंडांची सर्व वसुली त्याच्याकडेच जमा होत होती, अशी माहिती आहे. 
डॉनची दहशत संपणार 
तत्कालीन पोलिस आयुक्‍त डॉ. वेंकटेशम्‌ यांनी भूमाफिया दिलीप ग्वालबंशी याची दहशत संपवून पुन्हा जमिनीवर आणले होते. तोच कित्ता गिरवीत पोलिस आयुक्‍त डॉ. उपाध्याय यांनीही डॉन आंबेकरची दहशत समाप्त करण्याचे ठरविले आहे. त्याचाच भाग म्हणून डॉन संतोषला अनवाणी पायाने फिरविले होते. शहरातील गुन्हेगारीतून आंबेकरला नेस्तनाबूद करण्यासाठी पोलिस सज्ज असल्याचे बोलले जाते. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two arrested, hawala, don ambekar