रेल्वेच्या धडकेत दोन अस्वलांचा मृत्यू; एकाच्या डोक्‍याला व तोंडाला तर दुसऱ्याच्या पोटाला मार

टीम ई सकाळ
Wednesday, 3 March 2021

गाडीच्या धडकेत एका अस्वलाच्या डोक्‍याला व तोंडाला मार लागला तर दुसऱ्या अस्वलाच्या पोटाला जखमा आहेत. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाने दर्शविला आहे.

गोंदिया : बुधवारी सकाळी हावडा-मुंबई रेल्वे लाइनवरील गंगाझरी स्टेशनजवळ रेल्वेच्या धडकेत दोन अस्वलांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. दोन्ही अस्वलांचे वय अंदाजे तीन वर्ष आहे. याआधी याच रेल्वे रुळावर एका बिबट्याचासुद्धा अपघातात मृत्यू झाला होता. घटनास्थळाचा पंचनामा करून दोन्ही अस्वलांचे मृतदेह गंगाझरी येथील वनविभागाच्या कार्यालयात आणून शवविच्छेदन करण्यात आले.

गंगाझरी रेल्वेस्टेशनजवळ दोन अस्वल गाडी समोरून गेल्याची माहिती सकाळी गीतांजली एक्सप्रेसच्या चालकाने गोंदिया रेल्वे स्टेशनला दिली. रेल्वेस्थानक प्रशासनाने ही माहिती तत्काळ वनविभागाला दिली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या चमूसह घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता दोन्ही अस्वलांचा मृत्यू झाल्याचे उघड झाले.

अधिक वाचा - खुशखबर! सोनं घ्या सोनं; भाव झाले कमी; चांदी शौकिनांचीही होणार चांदी

गाडीच्या धडकेत एका अस्वलाच्या डोक्‍याला व तोंडाला मार लागला तर दुसऱ्या अस्वलाच्या पोटाला जखमा आहेत. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाने दर्शविला आहे. घटनास्थळाचा पंचनामा करून दोन्ही अस्वलांचे मृतदेह गंगाझरी येथील वनविभागाच्या कार्यालयात आणून शवविच्छेदन करण्यात आले.

अनेक वन्यप्राण्यांचा मृत्यू

गोंदिया जंक्‍शन हे रेल्वेस्टेशन हावडा-मुंबई लाईनवर आहे. गोंदियावरून मुंबईकडे जाताना पहिले गंगाझरी रेल्वेस्टेशन आहे. या स्टेशनपासून काही अंतरावर नागझिरा अभयारण्याचे जंगल आहे. त्यामुळे अनेकदा वन्यप्राणी रेल्वे मार्गावर येतात. त्यामुळे अनेकदा वन्यप्राणांना आपले जीव गमवावे लागते. मात्र, वन विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे वन्यप्रेमींकडून बोलले जात आहे.

जाणून घ्या - "आई तुझा प्रॉब्लेम काय आहे?" असं विचारत अवघ्या १६ वर्षांच्या मुलीनं घेतला गळफास; हृदयद्रावक घटना

नदीत उडी घेऊन विवाहितेची आत्महत्या

भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील रुयाळ येथील २५ वर्षीय विवाहितेने बुधवारी दुपारी पवनी येथे वैनगंगा नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करणाऱ्या विवाहितेचे नाव दीपाली शुभम खोब्रागडे आहे. तिने तीन वर्षांपूर्वी शुभमसोबत आंतरजातीय विवाह केला होता. तिला तीन वर्षांचा मुलगादेखील आहे. आत्महत्या करण्याचे कारण कळू शकले नाही. पवनी पोलिस पुढील तपास करीत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two bears die in train crash Gondia bears news