अचानक आला नदीला पूर; अन् घडले विपरीत

सकाळ वृत्तसेवा
Monday, 27 April 2020

प्राप्त माहितीनूसार रविवारी कोणतीही पूर्व सूचना न देता धरणाचे दोन गेट उघडल्याने नदीच्या पुलावरून पुराचे पाणी वाहू लागले. नदी काठी असणारी गावं, बार्शीटाकळी, आळंदा, कान्हेरी, खडकी चांदुर येथील शेतातून येणारे मजूर नदी काठावर अडकले. पिंपळखुट्याला जाणाऱ्या रस्त्यामधील पुलावरून पाणी वाहत असल्याने गावाचा संर्पक तुटला.

बार्शीटाकळी (जि. अकोला) : तालुक्यातील दगड पारवा येथील विदृपा प्रकल्पाचे दोन गेट रविवारी (ता.26) सकाळी10:30 वाजता दरम्यान उघडल्याने विदृपा नदीला पूर आला. त्यामुळे नदी काठच्या शेतात पुराचे पाणी घुसल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे.

हेही वाचा- अकोल्यातील युवकाने केली ‘कोविड’वर मात!

अनेक गावांचा संपर्क तुटला होता
प्राप्त माहितीनूसार रविवारी कोणतीही पूर्व सूचना न देता धरणाचे दोन गेट उघडल्याने नदीच्या पुलावरून पुराचे पाणी वाहू लागले. नदी काठी असणारी गावं, बार्शीटाकळी, आळंदा, कान्हेरी, खडकी चांदुर येथील शेतातून येणारे मजूर नदी काठावर अडकले. पिंपळखुट्याला जाणाऱ्या रस्त्यामधील पुलावरून पाणी वाहत असल्याने गावाचा संर्पक तुटला. नागरिक नदी काठी उभे राहुन पुराचे पाणी उतरण्याची वाट पाहू लागले. अचानक पणे नदीला आलेल्या पुरात बैल, गाय, बकऱ्या काही अतंरापर्यंत वाहुन गेल्यात. मात्र, त्या काठावर आल्याने त्यांचा जीव वाचला. सुदैवाने काही जिवीत हानी झाली नाही. लॉकडाउनच्या काळात काम धंदे व मजुरी बंद असल्याने आधीच शेतकरी अडचणीत आहे. तर, शेतातील झालेल्या नुकसानाने शेतकरी संकटात सापडला असल्याचे दिसून येते.

क्लिक करा- तेलाच्या गोदामाला आग; लाखोंचे नुकसान

संबंधितांनी दिली होती दवंडी
ग्रामीण भागातील शेती परिसरात जनावरांकरिता पाण्याची टंचाई असल्याने दगड पारवा जल प्रकल्पाचे दोन गेट उघडले होते. आता त्यातील एक गेट बंद केले आहे. पाणी सोडण्याबाबत संबधितांनी गावात दवंडी दिल्याचे सांगितले. नियमाची पूर्तता करूनच जनावरांसाठी नदीला पाणी सोडण्यात आले.
-गजानन हामंद, तहसीलदार, बार्शीटाकळी 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two gates of Vidrupa water project opened