दुर्गंधी येत असल्याने नागरिकांनी केली चौकशी, आढळले दोन मृतदेह

two hyenas found dead in wadasa of gadchiroli
two hyenas found dead in wadasa of gadchiroli
Updated on

गडचिरोली : वडसा वनविभागाअंतर्गत येत असलेल्या पोर्ला वनपरीक्षेत्रातील खरपी गावाच्या जंगल परिसरात कक्ष क्रमांक 599 मध्ये गुरुवारी (ता. 7) दोन तडस मृतावस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

प्राप्त माहितीनुसार, खरपी व टेंभा चक गावाला लागून असलेल्या जंगल परिसरात गुरुवारी सकाळी दुर्गंधी येत होती. त्यामुळे काही नागरिकांनी जाऊन बघितले असता त्यांना आधी एका तरसाचा मृतदेह दिसला. त्यानंतर तिथून जवळपास दीडशे ते दोनशे मीटर अंतरावर पुन्हा एका तरसाचा मृतदेह दिसला. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक वनसंरक्षक मनोज चव्हाण, क्षेत्र सहायक अंबादे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळीच या दोन्ही तरसांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर पंचनामा करून पंचासमक्ष मृतदेह जाळण्यात आले. या तरसांचा विषामुळे मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे. या दोन्ही तरसांच्या उत्तरीय तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच त्यांच्या मृत्यूमागील नेमके कारण कळू शकेल.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com