esakal | पुरातून दुचाकी काढणे भोवले, दोन तरुण गेले वाहून
sakal

बोलून बातमी शोधा

yavatmal

पुरातून दुचाकी काढणे भोवले, दोन तरुण गेले वाहून

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

दिग्रस (जि. यवतमाळ) : तालुक्यातील वसंतनगर येथील काळी(दौ) कडे जाणाऱ्या पुलावरून पुराचे पाणी वाहत असताना दुचाकी काढण्याच्या नादात दोन युवक वाहून गेले. ही घटना सोमवारी (ता.६) रात्री ७ वाजताच्या दरम्यान घडली. त्यामुळे या तरुणांनी दुचाकी पुराच्या पाण्यातून (yavatmal flood) नेण्याचा नाद चांगलाच भोवला. ज्ञानेश्वर जाधव (वय २८), सुरेश महिंद्रे (वय २७) असे वाहुन गेलेल्या युवकाचे नाव आहे. ते महागाव (mahagaon yavatmal) तालुक्यातील साई ईजारा गावचे रहिवासी आहेत.

हेही वाचा: नागपूरसह राज्यात आणखी निर्बंध लागणार का? वडेट्टीवारांनी दिले उत्तर

गेल्या दोन-तीन दिवसांपासून दिग्रससह तालुक्यातील ग्रामीण भागात पावसाची धुवाधार हजेरी सुरू आहे. सोमवारी (ता.७) सुद्धा सायंकाळपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावली. दरम्यान तालुक्यातील काळी (दौ) ते दिग्रस मार्गावर असलेल्या वसंतनगर येथील पुलावरून पाणी वाहत असताना देखील दोन युवकांनी दुचाकी घेऊन पूल पार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, देखील दुचाकी घेऊन जाण्याचा नाद त्या दोन्ही तरुणांना चांगलाच भोवला. दुचाकी घेऊन पूल पार करत असताना दोन्ही तरुण पुराच्या पाण्यात वाहून गेले. पुलाजवळ उभ्या असलेल्या नागरिकांनी या दोघांना थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या दोघांनी कुणाचेही एक ऐकले नाही. तरुण वाहून जात असताना घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी दुचाकी धरून मागे ओढण्याचा प्रयत्न केला. यामध्ये दुचाकी तर मागे आली. परंतु, दोन्ही तरुण वाहून गेले.

याबाबत दिग्रस पोलिस निरीक्षक सोनाजी आमले यांना माहिती मिळताच त्यांनी सहकाऱ्यांना घटनास्थळी रवाना केले. शोधकाऱ्यादरम्यान मंगळवारी (ता.७) सकाळी ज्ञानेश्वर जाधव याचा मृतदेह घटनास्थळापासून काही अंतरावर मिळाला असून सुरेश महिंद्रे याचा मृतदेह अद्याप मिळाला नाही. त्यामुळे पोलिस पथकाकडून सुरेश महिंद्रे याच्या मृतदेहाचे शोधकार्य अजूनही सुरू आहे.

loading image
go to top