आज आणखी 2 कोरोना पॉझिटिव्ह?प्रशासन चिंतेत

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 20 May 2020

बुधवारी दुपारी 12 वाजता आरोग्य विभागाला प्राप्त झालेल्या अहवालानुसार आणखी दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यातील एक रुग्ण मूळचा खेडेगाव येथील रहिवासी असून, तो कुरखेडा येथील संस्थात्मक विलगीकरण केंद्रात होता.

गडचिरोली  : लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याने गडचिरोली जिल्हा प्रशासनाच्या चिंतेत भर टाकली आहे. जिल्ह्यात आणखी 2 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले असून, आता पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या 8 झाली आहे. तीन दिवसापूर्वी कुरखेडा तालुक्‍यातील 4 व चामोर्शी तालुक्‍यातील 1 असे 5 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. त्यानंतर कुरखेडा, चामोर्शी व मुलचेरा तालुक्‍यातील 10 ठिकाणे कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आली. त्यानंतर मंगळवारी (ता.19) संध्याकाळी 7 वाजता एका रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. हा रुग्ण आरमोरी तालुक्‍यातील शंकरनगर येथील केंद्रात संस्थात्मक विलगीकरणात होता. त्यामुळे कालपर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 6 होती.
बुधवारी दुपारी 12 वाजता आरोग्य विभागाला प्राप्त झालेल्या अहवालानुसार आणखी दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यातील एक रुग्ण मूळचा खेडेगाव येथील रहिवासी असून, तो कुरखेडा येथील संस्थात्मक विलगीकरण केंद्रात होता. कुरखेडा येथे आढळलेल्या पहिल्या रुग्णासोबत तो संस्थात्मक विलगीकरणात होता. दुसरा रुग्ण चामोर्शी तालुक्‍यातील केंद्रात संस्थात्मक विलगीकरणात होता. यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या 8 वर पोहोचली आहे. नवे रुग्ण यापूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या 5 रुग्णांसोबत प्रवासाला गेलेल्यांच्या संपर्कातील होते, असे आरोग्य विभागाने सांगितले आहे.

सविस्तर वाचा - सुन्न करणारी बातमी, उपासमार असह्य झाल्याने दिव्यांग व्यक्तीची मंदिरात आत्महत्या

शंकरनगर, कुरखेडा व चामोर्शी येथील तिन्ही रुग्णांना जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात भरती केले जाणार आहे. काल गोंदिया जिल्ह्यात आढळलेले दोन रुग्णसुद्धा गडचिरोली जिल्ह्यातील रुग्णांसमवेतच मुंबईहून ट्रकने आले होते. त्यामुळे ट्रकचालकाच्या संपर्कात आलेल्या प्रवाशांचा
आरोग्य विभागाकडून शोध सुरू आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two more corona positives in Gadchiroli distrit