esakal | यवतमाळ : अरुणावती नदीला पूर, बैलगाडीसह तरुण गेला वाहून
sakal

बोलून बातमी शोधा

अरुणावती नदीला आलेला पूर

यवतमाळ : अरुणावती नदीला पूर, बैलगाडीसह तरुण गेला वाहून

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : जिल्ह्यातील आर्णी (arni yavatmal) तालुक्यातील अरुणावती नदीच्या पुरात तरुण शेतकरी बैलगाडीसह वाहून गेला. यामध्ये तरुणाला पोहता येत असल्याने तो वाचला. मात्र, दोन्ही बैल पुराच्या पाण्यात वाहत गेल्याने मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारच्या लिंगी-सायखेड पुलावर घडली.

हेही वाचा: महिला जवानाशी पर्यवेक्षकाचे अश्लील चाळे, शरीर सुखाची केली मागणी

गेल्या तीन दिवसांपासून विदर्भात पावसाने थैमान घातले आहे. त्यातच अरुणावती धरणाचे पाणी सोडल्याने अरुणावती नदीला पूर आला होता. लिंगी-सायखेड पुलावर तीन ते चार फूट पाणी होता. त्यातच पाण्याला वेग होता. तरुण सावंगा दिग्रस येथून सकाळी डोळंबा या गावाला जाण्यासाठी बैलगाडीने निघाला होता. गजानन खांदवे यांच्याकडून शेजारच्या गावातील नातेवाईकाने शेत बटईने केले होते. त्यामुळे त्याला शेतीकामांसाठी बैलजोडी पाहिजे होती. बैलजोडी आणण्यासाठी डोळंबा येथील नातेवाईक सुभाष भावसिंग राठोडला पाठविले होते. सुभाष बैलगाडीसह डोळंबाला जायला निघाला. सायखेडा ते लिंगीच्या मधून अरुणावती नदी वाहते. याच नदीच्या पुलावर तीन ते चार फूट पाणी होते. त्यामधून बैलगाडीसह सुभाष वाहून गेला. मात्र, त्याला पोहता येत असल्याने तो काठावर आला. त्यामुळे त्याचा जीव वाचला. पण, बैल पुरात वाहून गेल्याने दोन्ही बैलांचा मृत्यू झाला होता. सदर घटनेचे वृत लिहिस्तोवर कुठलाही पंचनामा किंवा पोलिस तक्रार दाखल केली नव्हती.

loading image
go to top