esakal | यवतमाळ जिल्ह्यात दोन हजार कुपोषित बालकं; कोट्यवधी खर्च
sakal

बोलून बातमी शोधा

यवतमाळ जिल्ह्यात दोन हजार कुपोषित बालकं; कोट्यवधी खर्च

यवतमाळ जिल्ह्यात दोन हजार कुपोषित बालकं; कोट्यवधी खर्च

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : जिल्ह्यातील कुपोषण निर्मूलन करण्यासाठी शासन, प्रशासनस्तरावरून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अजूनही जिल्ह्याला लागलेला कुपोषणाचा डाग पुसला गेलेला नाही. जिल्ह्यातील अजूनही दोन हजार बालके कुपोषणग्रस्तांच्या यादीत आहेत. कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. जिल्ह्यातील कुपोषण कमी व्हावे, यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. (Two-thousand-malnourished-children-in-Yavatmal-district--nad86)

महिला बालकल्याण विभागासोबत १६ प्रकल्पांच्या माध्यमातून कुपोषण निर्मूलनाचे कार्य केले जात आहे. जिल्ह्याअंतर्गत एक लाख ६७ हजार ४५८ बाळांचे जन्म झालेली आहेत. यात श्रेणीनिहाय बालकांचा समावेश आहे. जिल्ह्यात सर्वसाधारण श्रेणीत एक लाख ५१ हजार ५६२ बालके आहे. मध्य कुपोषित श्रेणीत १३ हजार ३६५ बालकांचा समावेश आहे. तीव्र कुपोषित श्रेणीत दोन हजारांवर बालकांचा समावेश आहे. याशिवाय सॅम श्रेणीत १६० तर मॅम श्रेणीत ७७५ बालकांचा समावेश आहे.

हेही वाचा: ‘...अन्यथा तुझ्या शरीराचे चार तुकडे करून चार राज्यात फेकून देईल’

कुपोषण कमी व्हावे, यासाठी शासनस्तरावरून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. पोषणआहारापासून तर आरोग्याच्या सुविधा पोहोचविल्या जात आहे, असे असतानाही कुपोषित बालकांची संख्या कमी झालेली नाही. जिल्ह्यातील प्रमाण कमी व्हावे, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सातत्याने वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. तसेच पाचशेच्यावर बालविकास केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. यात सॅम बालकांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यातील बालमृत्यू दर दरहजारी २.२० तर मातामृत्यू दर ०.१२ येवढा आहे. पूर्वीच्या तुलनेत यात मोठी घट झाली आहे. संख्या झपाट्याने कमी झाली असली तर अजूनही काही प्रमाणात कुपोषित बालकांचे प्रमाण आहे. ते पूर्णपणे नष्ट करण्यासाठी शासन तसेच प्रशासनाने मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात कुपोषणाचे प्रमाण कमी होईल, असा विश्‍वास प्रशासनाला आहे.

हेही वाचा: बोंबला! निकालाचे संकेतस्थळच ‘क्रॅश’; विद्यार्थ्यांची धावपळ

क्षेत्रावर बारीक लक्ष

जिल्ह्यातील काही भागात कुपोषणांचे प्रमाण आहे. या क्षेत्रावर प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. या भागातील गरोदर मातांची माहिती संकलित करून त्यांना आवश्यक ते मार्गदर्शन केल्या जात आहे. शिवाय, आरोग्य विषयक बाबींचा साहित्यपुरवठा केला जात आहे.

(Two-thousand-malnourished-children-in-Yavatmal-district--nad86)

loading image