
भंडारा : तालुक्यातील गराडा येथे संरक्षित वनातील कालव्याच्या वितरिकेत बुडून वाघाच्या दोन बछड्यांचा (Tiger calves) मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. यानंतर वन अधिकारी-कर्मचाऱ्यांनी (Officers and staff) घटनास्थळी तपास करून राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या कार्यपद्धतीनुसार शवविच्छेदन करण्यात आले. (Two tiger calves drown at Bhandara)
पोलिस भरतीसाठी सकाळी सराव करणारे काही युवक बासोरा, गराडा येथील टेकेपार सिंचन प्रकल्पाच्या कालव्यावरील पुलावर काही वेळ बसले. तेव्हा त्यांना सायफनच्या पाण्यात तरंगताना वाघाचे बछडे दिसून आले. त्याबाबत गावकऱ्यांना माहिती झाली. आशीष हलमारे यांनी वनरक्षक मनोहर कोठेवाड यांना त्याबाबत माहिती दिली. वनरक्षकाने वनपरिक्षेत्र अधिकारी आणि विभागाला माहिती दिली. त्यानंतर उपवनसंरक्षक भलावी, सहायक वनक्षेत्राधिकारी साकेत शेंडे, परिक्षेत्र अधिकारी विवेक राजूरकर आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. तसेच मानद वन्यजीव रक्षक शाहीद खान व नदीम खान हेसुद्धा यावेळी उपस्थित होते.
गराडा संरक्षित वनातील कक्ष क्रमांक १७८ मध्ये मुख्य कालव्याच्या सायफन विहिरीत मृत बछडे मिळून आले. अंदाजे मंगळवारच्या रात्री दोन ते अडीच वर्षे वयाचे दोन बछडे (मादी) बुडाल्याची शक्यता आहे. या बछड्यांच्या आईचा शोध घेण्यासाठी परिसरात कॅमेरा ट्रॅप लावून शोध मोहीम राबविण्यात येत आहे. व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाऱ्या कार्यपद्धतीनुसार पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गुणवंत भडके, डॉ. हटवार यांनी शवविच्छेदन केले.
पवनी तालुक्यात एका बछड्याचा मृत्यू
पवनी तालुक्यातील सावरला जवळील गुडेगाव शिवारात २८ मार्चला कक्ष क्रमांक ३११ मधील कालव्याजवळ वाघीण दोन बछड्यांसह असल्याने गावकऱ्यांची गर्दी झाली होती. वनरक्षकांनी पवनीचे वनपरिक्षेत्र अधिकारी यांना त्याबाबत माहिती दिली. तेव्हापासून वाघीण व बछड्यांवर सतत लक्ष ठेवले जात होते. परंतु, मंगळवारी वाघीण एका बछड्याला घेऊन दुसरीकडे निघून गेली. त्यानंतर अशक्त असलेल्या बछड्याला रेक्यू टीमने रेस्कू केले. उपचार केल्यावर वाघीण परत येईल म्हणून रात्री बछड्याला त्याच ठिकाणी परत ठेवले. परंतु, वाघीण आलीच नाही. आज सकाळी तो बछडा मृतावस्थेत आढळून आला. शवविच्छेदन केल्यावर बछड्याचा मृतदेह पुरण्यात आला.
सपदंशाने अस्वलाचा मृत्यू
खापा जवळील वाघबोडी जंगलात वनकर्मचाऱ्यांना गस्तीवर असताना अंदाजे २० वर्षे वयाचा नर अस्वल मृतावस्थेत आढळून आला. उपवनसंरक्षक भलावी, परिक्षेत्र अधिकारी राजूरकर यांच्या उपस्थितीत डॉ. गुणवंत भडके, डॉ. हटवार यांनी शवविच्छेदन केले. या अस्वलाचा मृत्यू विषारी सापाने दंश केल्यामुळे झाल्याचा अंदाज पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्यानंतर दवडीपार रोववाटीकेत अस्वलाच्या मृतदेह दहन करण्यात आला.
(Two tiger calves drown at Bhandara)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.