
सडक अर्जुनी
ट्रक एकमेकांवर आदळून झालेल्या विचित्र अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (ता. २१) सकाळी आठच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील सहाकेपार गावाजवळ घडली. चालक साजिद खान (वय ३०) व क्लिनर सादाब खान (वय २८, दोघेही रा. उज्जैन उत्तर प्रदेश) अशी मृतांची नावे आहेत.