
शेंदूरजनाघाट : येथील दोन महिलांचा ३० जुलै रोजी सर्पदंश झाल्याने मृत्यू झाला. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे वरुडातील राजुरा नाका परिसरातील एका युवकाला सर्पदंश झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी अमरावतीला रेफर करण्यात आले. सर्पदंशाच्या घटनेमुळे तालुक्यात सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे.