
यवतमाळ : कोरोनाच्या संकटाने अख्ख्या जगालाच हादरा दिला आहे. या संकट काळात नाते दूर होत असतानाच परक्या व्यक्तीकडून मायेचा ओलावादेखील अनुभवायला मिळातो आहे. कोरोनामुक्त होऊन घरी परतलेल्या चिमुकलीला कडेवर घेऊन उपविभागीय पोलिस अधिकारी माधुरी बाविस्कर यांनी कौतुक केले. तसेच खाऊसाठी पैसेही दिले. यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून कोरोनामुक्त होऊन बरी परतलेल्यांचे स्वागत केले.
यवतमाळ येथे विदेशातून आलेल्या नागरिकांमुळे कोरोनाची पहिली नोंद मार्च महिन्यात झाली. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन सुरू असतानाच एप्रिल महिन्यात एकाच दिवशी आठ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यामुळे प्रशासन पार हादरून गेले होते. शहरातील इतर भागात संसर्ग होऊ नये यासाठी रात्रभरात प्रभाग दहा व वीसला प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले. तरीदेखील एकाच विशिष्ट भागातून पॉझिटिव्ह रुग्ण संख्येचा वाढता वेग चिंता वाढविणारा होता.
पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 98 वर गेली असतानाच डॉक्टरांच्या उपचाराचे सकरात्मक परिणाम यायला लागले. मे महिन्यात "पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह' झालेल्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन कक्षातून सुटी देण्यात आली. त्यातही शनिवार (ता.16) हा दिवस जिल्हावासींसाठी दिलासा देणारा ठरला. या एकाच दिवशी आयसोलेशन वॉर्डातून तब्बल 38 करोनामुक्त झालेल्यांना सुटी देण्यात आली.
बरे हाऊन हे रुग्ण प्रतिबंधित क्षेत्र असलेल्या आपल्या घरी रुग्णवाहिकेतून परतले. यावेळी बंदोबस्तावर असलेल्या उपविभागीय पोलिस अधिकारी माधुरी बाविस्कर स्वत:हून रुग्णवाहिकेजवळ आल्यात. एक चिमुकली आईसोबत खाली उतरली. तिचे कौतुक करीत खाऊसाठी पैसे दिले. दुसऱ्या चिमुकलीला रुग्णवाहिकेतूनच कडेवर घेत कौतुक केले. यावेळी उपस्थित असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी टाळ्यांचा गजर करीत स्वागत केले. अंगावर खाकी वर्दी असली तरी सर्वप्रथम तो एक माणूस असतो आणि संवेदनाही असताच, याचा परिचय पुन्हा एकदा आला.
कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून उपविभागीय पोलिस अधिकारी माधुरी बाविस्कर यांनी वैयक्तिक कामांना दूर सारत कर्तव्याला प्राधान्य दिले. येथे रूजू झाल्यापासून त्यांच्यातील संवेदनशीलतेचा परिचय अनेकदा आला आहे. "कोरोना' नाव उच्चारताच हृदयात धस्स होते. पॉझिटिव्ह असो अथवा निगेटिव्ह त्या व्यक्तीच्या जवळपासही कुणी जात नाही. अशाच संकट काळात आपलुकीच्या मायेने गोंजारणाऱ्या खाकी वर्दीतील अधिकाऱ्याच्या संवेदशीनलेता परिचय यवतमाळकरांना आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.