‘जे जे करणं शक्य असेल ते माझ्या नागपुरात करील’; मुख्यमंत्री असं का म्हणाले...

udhav thakare said He will do whatever is possible in my Nagpur political news
udhav thakare said He will do whatever is possible in my Nagpur political news

नागपूर : मागील वीस ते पंचवीस दिवसांत माझा हा विदर्भातील तिसरा दौरा आहे. पहिल्यांदा गोसेखुर्दच्या पाहण्यासाठी आलो होतो. त्याच्या दोन दिवसांनी भंडाऱ्यात पुन्हा आलो. आज पुन्हा आलो. उगाच अफवा पसरवली जाते. माझे आजोळ अमरावती जिल्ह्यातील परतवाड्या तालुक्यातील आहे. आमच्यात विदर्भाच रक्त आहे. आम्हाला विदर्भावर प्रेम नाही असे म्हणणे चुकीचे आहे. ‘जे जे करणं शक्य असेल ते माझ्या नागपुरात करील’ असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

‘बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्याना’च्या उद्‍घाटनाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, सुनील केदार, संजच राठोड, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव विकास, महापौर दयाशंकर तिवारी, राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, खासदार कृपाल तुमाने, आमदार आशीष जैस्वाल,

विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, नागपूर महानगर विकास प्राधिकरणाच्या आयुक्त शीतल तेली-उगले, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, पोलिस अधीक्षक (ग्रामीण) राकेश ओला, डॉ. बसवराज तेली, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा आदींची उपस्थिती होती.

सुरुवातीला गोसेखुर्द धरणाची पाहणी करण्यासाठी आलो होते. गोसेखुर्द पाहण्याची मनापासून इच्छा होती. म्हणून एकदा भेट देण्याची मनात इच्छा होती. ईथे भेट दिल्यानंतर अनेक गैरसमज दूर झाले. दोन दिवसांनी भंडाऱ्यातील रुग्णालयाला आग लागली. भेट देण्यासाठी पुन्हा याव लागल. आज ‘बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्याना’साठी आलो. महिनाभपापूर्वी अमरावती बाळासाहेब ठाकरे महामार्गाची पाहणी करण्यासाठी आलो होतो.

माझे आजोळ अमरावती जिल्ह्यातील परतवाड्या तालुक्यातील आहे. आमच्यात विदर्भाच रक्त आहे. आम्हाला विदर्भावर प्रेम नाही असे म्हणणे चुकीचे आहे. ‘जे जे करणं शक्य असेल ते माझ्या नागपुरात करील’ असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. नागरिकांना आता पर्यावरणाचे महत्व समजू लागले आहे. याचा आनंद आहे. १ मे रोजी नागपूर ते शीर्डी समृद्धी मार्गाचे उद्घाटन करण्याचे ठरवले आहे, ते होईल, असेही ते म्हाणाले.

वनराजधानीची सुरुवात नागपूरपासून

विकास म्हणजे नक्की काय हे महाविकासआघाडीच्या सरकारने करून दाखवले आहे. मागील एका वर्षात नुकसान भरपाई म्हणून साडेतेरा हजार कोटी या सरकारने खर्च केले. नागपूर आणि विदर्भात पर्यटक कसे आणायचे याची जबाबदारी सर्वांना घ्यायची आहे. वनराजधानीची सुरुवात नागपूरपासून होईल, असे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com