उमेश अग्रवाल यांच्या परिवाराने घेतला अवयवदानाचा निर्णय

राजेश सोळंकी
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

आर्वी (वर्धा): येथील उमेश राधाकिसन अग्रवाल वय 52 राहणार मारवाडी पुरा बालाजी वार्ड यांचा मौजा जांब येथे अपघात झाला असता त्यांना अमरावती येथे दाखल केले मात्र तीन दिवस उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. उमेश अग्रवाल यांच्या परिवाराने सामाजिक दायित्व जोपासून अवयव दान करण्याचा निर्णय घेतला अशा दुःखद प्रसंगी असा निर्णय घेणाऱ्या परिवाराचे अनेकांनी कौतुक केले आहे.

आर्वी (वर्धा): येथील उमेश राधाकिसन अग्रवाल वय 52 राहणार मारवाडी पुरा बालाजी वार्ड यांचा मौजा जांब येथे अपघात झाला असता त्यांना अमरावती येथे दाखल केले मात्र तीन दिवस उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. उमेश अग्रवाल यांच्या परिवाराने सामाजिक दायित्व जोपासून अवयव दान करण्याचा निर्णय घेतला अशा दुःखद प्रसंगी असा निर्णय घेणाऱ्या परिवाराचे अनेकांनी कौतुक केले आहे.

या निर्णयामुळे अवयव प्रत्यारोपण करून अत्यंत गरजू लोकांचे प्राण वाचविणे शक्य होईल. अवयव दान केल्यावर त्याचे पार्थिव (शुक्रवारी ता 7)दुपारी आर्वीत आणण्यात आले त्यांचेवर शनिवारी (ता. 8) सकाळी 9 वाजता अंतिम संसाकार करण्यात येणार आहे. घटना याप्रमाणे मंगळवारी (ता,4) उमेश अग्रवाल हे त्यांची मोठी बहीण शकुंतला यांना तळेगाव येथे पोहोचविण्यासाठी निघाले होते शकुंतला यांना त्यांनी ऑटो त बसविले आणि ते मोटरसायकलने निघाले बहिण तळेगावला पोचली मात्र याच दरम्यान मौजा जाम्ब येथे अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली मार्गस्थ असलेल्या काही लोकांनी गाड्या थांबून त्वरित 108 वर संपर्क करून येथील उपजिल्हा रुग्णालयात उमेश अग्रवाल यांना दाखल केले वैद्यकीय अधिकाऱ्यांनी परिस्थिती पाहून त्वरित उपचारार्थ हलविण्यास सांगितले डॉ. अविनाश लव्हाळे डॉक्टर अशीश सोनी यांनी प्राथमिक उपचार करून त्यांना उपचारासाठी हलविण्याचा सल्ला दिला. त्यांना अमरावती येथे हलवल्यावर डोक्याला जबर मार असल्याने उपचारा दरम्यान गुरुवारी त्यांचा मृत्यू झाला. अमरावतीचे सबनीस प्लॉटमधील रेडीएत सुपर स्पेशलिटी दवाखान्यात उमेश अग्रवाल यांना ठेवण्यात आले होते तेथील सर्जन डॉक्टर सिकंदर अडवाणी प्रशासन आणि अग्रवाल परिवार यांचे सहकार्याने अवयवदान प्रक्रिया पूर्ण करून आवश्यक रुग्णांना नवजीवन देण्यासाठी प्रयत्न झालेत.

यासाठी नागपूर येथून न्यू होकार्ट न्यू इरा आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ची तज्ञ यांना पाचारण केले होते. उमेशचा विवाह अठरा वर्षांपूर्वी झाला त्यांना मुले नाहीत त्यांच्या मागे पत्नी मोठा भाऊ दोन बहिणी व आप्तपरिवार आहे. उमेश अग्रवाल यांचा मोठा भाऊ महेश वहिनी स्नेहा पत्नी इशा दोघा बहिणींनी आणि परिवारांनी उमेशचे अवयव दान करण्याची स्वीकृती दिली. हृदय, किडनी, लिव्हर, डोळे काढून आवश्यक असलेल्या व्यक्तींना प्रत्यारोपण केल्या जाणार आहे. जेडतीसीसी माध्यमातून आशा गरजू रुग्णाचा देशात शोध सुरू आहे. यासाठी चार्टर्ड विमानाची ही व्यवस्था करण्यात आली आहे, असे डॉक्टर सिकंदर आडवाणी यांनी सांगितले.

Web Title: Umesh Agarwals family took the decision of organism