Unauthorized Statue : विनापरवानगी पुतळा बसवला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
Gram Panchayat Dispute : उबाळखेड येथे ग्रामपंचायत जागेत विनापरवानगी पुतळा बसवल्याप्रकरणी तिघांविरुद्ध धामणगाव बढे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोताळा : तालुक्यातील उबाळखेड येथे ग्रामपंचायतीच्या जागेत अनधिकृतपणे विनापरवानगी पुतळा बसविणाऱ्या तिघांविरुद्ध धामणगाव बढे पोलिसांनी बुधवारी (ता. ७) गुन्हा दाखल केला आहे.